स्त्रीशक्तीच्या आर्थिक साक्षरतेचा जागर

लक्ष्मीकांत श्रोत्री
Monday, 19 October 2020

सध्याच्या बदलत्या वातावरणात महिलादेखील पैसे कमवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही पैशाचा योग्य उपयोग करणे आणि पैशाचे योग्य प्रकारे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे.

सध्या नवरात्र सुरू असल्याने स्त्रीशक्तीचा जागर केला जात आहे. आजच्या काळात आणि सध्याच्या बदलत्या वातावरणात महिलादेखील पैसे कमवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही पैशाचा योग्य उपयोग करणे आणि पैशाचे योग्य प्रकारे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे, की पुरुषमंडळी आपल्या पश्‍चात आपल्या गृहलक्ष्मीला आर्थिक ताण येऊ नये म्हणून आर्थिक नियोजन जरूर करतात. पण, पुरेसे आर्थिक ज्ञान नसल्याने त्याचा त्यांना १०० टक्के फायदा होईल, याची काही शाश्‍वती नसते.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर महिलांना सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी काय-काय समजणे अपेक्षित आहे, ते पाहूया.
 
बचत आणि गुंतवणूक यांतील फरक.
निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीचे पर्याय.
उदा. ः मुदत ठेवी, बाँड आदी.
गुंतवणुकीच्या सरकारी आणि सुरक्षित योजनांची माहिती.
शेअर आणि शेअर बाजार म्हणजे काय?
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंडाच्या योजनांचे प्रकार किती व कोणते?
प्राथमिक स्वरूपातील प्राप्तिकर आणि त्याच्या आकारणीची माहिती.
कोणत्या गुंतवणूक प्रकारात किती जोखीम आहे?
सोन्यामधील गुंतवणूक आणि त्याचे उपलब्ध पर्याय.
विमा म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि महत्त्व.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पैसे कमविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पैशाचे नियोजन कसे करायचे, हे माहीत असणे आवश्यक आहे. आपण आजूबाजूला पाहिले तर अशी हजारो उदाहरणे सापडतील, की जिथे पैसा हाती असूनही महिलांची परवड झाली आहे. त्यामुळे फक्त पैसा मिळविण्याचे ज्ञान असून उपयोग नाही, तर पैसा सांभाळण्याचे ज्ञान पण आजच्या स्त्रीशक्तीला असणे तेवढेच आवश्यक आहे. नवरात्राच्या निमित्ताने स्त्रीशक्तीच्या आर्थिक साक्षरतेचा जागरही करायला हवा, नाही का? (लेखक सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर - सीएफपी आहेत.)

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxmikant Shrotri article about women financial literacy