esakal | "टॅक्स' वाचवणारे चार मित्र
sakal

बोलून बातमी शोधा

tax

संकटसमयी जो आपल्यासोबत राहतो आणि मदत करतो, तोच खरा मित्र. पण मित्र हा फक्त माणूसच असू शकतो का? तर नाही. नियम आणि कायदे हे आपले मित्रच असतात. आज चार मित्रांची पुन्हा एकदा गरज भासणार आहे.

"टॅक्स' वाचवणारे चार मित्र

sakal_logo
By
लक्ष्मीकांत श्रोत्री

प्रत्येकाला प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) कसा वाचविता येईल याची काळजी असते. आपले चार मित्र 80C, 80D, 80CCD आणि 80CCD(2) हे आपल्याला त्याकामी खूप मोठी मदत करू शकतात. पण, त्यासाठी आपल्याला जागरूक राहत योग्यवेळी योग्य मित्राची मदत घेणे आवश्यक आहे. आपण वेळेवर कृती केली तर हे मित्र नक्की "इन्कम टॅक्स' वाचविण्यासाठी मदत करतील. सामान्यपणे मार्च महिन्यात कर आणि त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीचे विचार करतो, पण ते योग्य नाही. करबचत आणि त्यासाठी लागणारी गुंतवणुक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केली पाहिजे. म्हणजे त्यामुळे एकरकमी गुंतवणूक करावी न लागता टप्याटप्याने करता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

1) 80C : या मित्राच्या मदतीने आपण 1.5 लाखांपर्यंत वजावट मिळवू शकतो, पण त्यासाठी आपल्याला 1.5 लाखांपर्यंत गुंतवणुक करणे आवश्यक आहे. जर आपण 1.5 लाख रुपये हे तक्त्या मध्ये दिलेल्या पैकी एकात किंवा एकूण मिळून गुंतवले तरी त्याचा फायदा होईल.

पर्याय 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ): भारत सरकारच्या या योजनेत मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या पैशावर कर आकारला जात नाही.

इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस): इक्विटी म्युच्युअल फंड योजना आहे. यातील गुंतवणूक तीन वर्षे काढता येत नाही. 

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी): पोस्टाच्या माध्यमातून या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करू शकतो.

मुदत ठेव–कर बचत: कर बचत करणाऱ्या विशिष्ट मुदत ठेव योजना आहेत, पण यातून 5 वर्ष पैसे काढता येत नाहीत.

ट्युशन फी: ही वजावट फक्त शैक्षणिक शुल्कावर मिळते,मात्र इतर शुल्क जसे की, प्रवेश परिक्षेवर मिळत नाही. 

गृह कर्जाची परतफेड: फक्त मूळ मुद्दल त्या आर्थिक वर्षात भरली असेल त्यावर,  मुद्रांक शुल्क  किंवा घर खरेदीसाठी भरलेले नोंदणी शुल्क इ. येणारा खर्च

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

2) 80D – हा तर सगळ्यात महत्त्वाचा आणि जवळचा मित्र. सध्याच्या काळात वाढत जाणारे वैद्यकीय सर्वजण पाहतो आहोत. यासाठी "हेल्थ इन्श्युरन्स' घेणे आवश्यक आहे. जर कुटुंबाचे आणि घरातील ज्येष्ठांसाठी विमा पॉलिसी घेतली तर त्याच्या "प्रीमियम'च्या रकमेएवढी वजावट मिळू शकते (प्रकार आणि त्यावर मिळणारी वजावट पुढीलप्रमाणे). 

- स्वतः आणि कुटुंब : 25 हजार रुपये
- स्वतः आणि कुटुंब + पालक: 50 हजार रुपये
- स्वतः आणि कुटुंब + ज्येष्ठ पालक : 55 हजार रुपये
-स्वतः (ज्येष्ठ नागरिक) आणि कुटुंब  + ज्येष्ठ पालक : 60 हजार रुपये
-स्वतःचे आणि कुटुंबाच्या हेल्थ चेकअपसाठी दिलेली रक्कम: 
10 हजार  (5 हजार (स्वतः) + 5 हजार (पालक))

इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


3) 80CCD (1B) – आपला हा मित्र करही वाचवेल आणि निवृत्तीमध्ये परतावा देऊन मदतही करेल. जर "नॅशनल पेंशन स्कीम'मध्ये (एनपीएस) पैसे गुंतवले तर 50 हजार रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते आणि ही वजावट 80 C च्या 1 लाख 50 हजार रुपयांच्या व्यतिरिक्त मिळते.

4) 80CCD(2): या मित्राच्या मदतीने दोन लाख रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते. पण, यासाठी नोकरी पेशा असणे आवश्यक आहे. कंपनी मूळ वेतनाच्या 10 टक्के आणि जास्तीतजास्त 2 लाख रुपये "एनपीएस'मध्ये भरत असेल तर आपला कर वाचू शकतो.

योग्यवेळीच जागे व्हा आणि या चार मित्रांची मदत घ्या. कारण "Money save is money gained". हो पण कर सल्लागाराशी चर्चा जरूर करा आणि आपल्यादृष्टीने जे योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करून कर वाचवा. आपण चार मित्रांसह आणखी काही कर वाचविणाऱ्या मित्रांची येत्या काळात स्वत्रंतपणे ओळख करून घेणार आहोत. 

लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर आहेत