Thur, March 23, 2023

Philips Layoffs : फिलिप्समध्ये होणार नोकरकपात! जगभरात ६००० जणांची जाणार नोकरी
Published on : 30 January 2023, 7:03 am
जगभरातील बड्या कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जात आहे. यामध्ये आणखी एका कंपनीची भर पडली असून मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने सोमवारी जगभरातील ६००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकासानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स (Roy Jakobs) यांनी एका निवेदनात २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांची सध्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.