मद्याच्या बाटल्यांवर आता वैधानिक इशारा सक्तीचा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

नवी दिल्ली - मद्याच्या बाटल्यांवर अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाद्वारे ठरवून देण्यात आलेले मापदंड जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले असून, याची अंमलबजावणी एक एप्रिल २०१९ पासून सुरू होणार आहे. ‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक आहे,’  ‘सुरक्षित राहा, मद्यपान करून गाडी चालवू नका,’ ही इशारावजा वाक्‍ये दारूच्या प्रत्येक बाटलीवर इंग्रजीसह त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत लिहिणे सक्तीचे राहील.

या बदलांसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती राज्याच्या शुल्क उत्पादन आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी आज दिली. दिल्लीत झालेल्या सर्व राज्यांच्या राज्य शुल्क उत्पादक आयुक्त आणि अन्न विभागाच्या आयुक्तांच्या बैठकीत नव्या नियमावलीची माहिती दारू उत्पादक कंपन्यांना देण्याची सूचना करण्यात आली. 

केंद्राच्या २००६ च्या निर्णयाप्रामाणे सर्व प्रकारची दारू आता प्राधिकरणाच्या कक्षेत आली आहे. वैधानिक इशाऱ्याबरोबरच दारूच्या बाटल्यांच्या मागील बाजूला त्या ब्रॅंडच्या दारूत असलेले घटक, त्यांचे प्रमाण वैद्यकीय धोका आदी बाबी नमूद करणेही आवश्‍यक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The legal warning is now compulsory on bottles of alcohol