''सध्या आमच्या कंपनीचे गृहकर्जावरील व्याजदर हे आतापर्यंत सर्वात कमी आहे. त्याचा आमच्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. त्यामुळे किफायतशीर हफ्त्यांमुळे नव्या घरांची खरेदीसाठी मागणी वाढेल'', अशी माहिती एसआयसीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी दिली.
मुंबई : कर्जपुरवठादार कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सने (एसआयसीएचएफएल) त्यांच्या व्याजदरात आतापर्यंतची सर्वात मोठी कपात केली आहे. ज्या ग्राहकांचा सिबील स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्यांना 6.90 टक्के व्याजदर लागू होतील. बुधवारी (ता.२२) रोजी एसआयसीएचएफएलने जारी केलेल्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांनी 50 लाखांपर्यंतचे कर्ज घेतले असतील आणि त्यांचा सिबील स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्यांना 6.90 टक्के व्याजदर लागू होतील. तसेच ज्यांचे कर्ज 50 लाखांहून अधिक असेल त्यांना 7 टक्के व्याजदर लागू होतील.
''सध्या आमच्या कंपनीचे गृहकर्जावरील व्याजदर हे आतापर्यंत सर्वात कमी आहे. त्याचा आमच्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. त्यामुळे किफायतशीर हफ्त्यांमुळे नव्या घरांची खरेदीसाठी मागणी वाढेल'', अशी माहिती एसआयसीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी दिली.
पेन्शनर्ससाठी नवी योजना...
एलआयसी हाऊसिंग फायनान्सने खास पेन्शनर्स व्यक्तींसाठी खास गृहकर्ज योजना सादर केली आहे. गृह वरिष्ठ असे या योजनेचे नाव असून
त्याची मुदत 30 वर्षे किंवा ग्राहकाच्या वयाच्या 80 वर्षे यापैकी जी लवकर असेल तितकी असणार आहे, अशी माहिती मोहंती यांनी दिली.
संपादक- सुस्मिता वडतिले