LIC ची भन्नाट योजना; २८ लाखांसाठी गुंतवा नाममात्र रक्कम

LIC
LICesakal

मुंबई : भविष्याची तरतूद म्हणून आपल्यापैकी अनेकजण थोडी का होईना पैशांची बचत करीत असतो. ही काळाजी गरजही झाली आहे. आता नवीन नवीन स्कीम बाजारात आल्या आहेत. यामुळे ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अगोदर एलआयसीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. खासगी संस्था चांगले पर्याय देत असल्याने नागरिक त्याकडे वळले होते. मात्र, आता एलआयसीने सुपरहीट योजना आणून ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याची योजना आखली आहे.

भविष्यात एकसुद मोठी रक्कम हाती यावी याचा नागरिकांकडून प्रयत्न असतो. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, निवृतीनंतरत्या जीवनसाठी काही रक्कम गुंतवली जाते. म्हणजे गरजेच्या वेळी ताण पडू नये हा यामागील उद्देश असतो. यासाठी आता थोडा त्रास सहन कराव लागला तरी चालेल. अशा अनेक योजना एलआयसीकडे उपलब्ध आहेत.

LIC
सावंगी रुग्णालयात शिरला बिबट; पाच तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद

नागरिकांची गरज लक्षात घेऊन एलआयसीने एक विशेष योजना आणली आहे. याअंतर्गद महिन्याला सहा हजार रुपये निवेश करणाऱ्याला गुंतवायचे आहे. म्हणजे दिवसाला दोनशे रुपयांची सेव्हिंग करायची आहे. या योजनेचे नाव जीवन प्रगती आहे. याअंतर्गद तुम्हाला २८ लाखांची मॅच्योरिटी मिळेल. मात्र, यासाठी तुम्हाला वीस वर्षे पैसे गुंतवावे लागणार आहे. प्रिमीयम भरण्याच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे दिले जातील.

महत्त्वाच्या बाबी

  • ही योजना बचत आणि सुरक्षांच्या लाभांसह एक गैर-लिंक्ड योजना आहे.

  • ही एक वयक्तिक योजना आहे.

  • वार्षिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक आणि मासिक पर्याय प्रिमीयमसाठी निवडू शकता.

  • कमीत कमी १२ व कमाल २० वर्षांसाठी ही योजना असेल.

  • विमा रक्कम किमान १.५ लाख तर कमाल कितीही जमा करू शकता.

  • सम एश्योर्ड, फायनल एक्स्ट्रा बोनस (एफएबी) आणि सिंपल रिपिट बोनसचे पेमेंट मॅच्युरिटीनंतर मिळते.

  • अंतिम अतिरिक्त बोनस (FAB)आणि साधारण पुनरीक्षण बोनस मृत्यू विमा राशीवर दिला जातो.

  • विमाधारकाचा मृत्यू झाल्यास मृत्यू विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या दहापट अधिक असू शकते.

  • पॉलिसीच्या पाच वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सम एश्योर्डचा शंभर टक्के लाभ मिळेल.

  • पॉलिसीमध्ये दर पाच वर्षांनी रिस्क कव्हर वाढतो

  • पहिल्या पाच वर्षात सम अश्योर्ड तेवढीच राहते

  • यानंतर सहा ते दहा वर्षांच्या काळात २५ टक्क्यावरून १२५ टक्के होतो

  • ११ ते १५ वर्षांसाठी सम अश्योर्ड १५० टक्के होतो.

LIC
‘मुझे आप पसंत हो’ म्हणणाऱ्या युवकाला नागरिकांनी चोपले

हेही वाचा

  • वय १२ ते ४५ वर्ष असावे

  • पॉलिसी कालावधी १२ ते २० वर्षांचा

  • मॅच्योरिटीचे जास्तीत जास्त वय ६५ वर्ष

  • पॉलिसीधारकाने ती वर्ष प्रीमियम भरला तर तो पॉलिसी सरेंडर करू शकतो आणि सरेंडर मूल्य मिळवू शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com