फक्त एकदाच भरा प्रिमियम आणि दरमहिना मिळवा पेन्शन; कोणती आहे ही पॉलिसी ?

LIC
LICGoogle

Life Insurance Corporation of India ने 'न्यू जीवन शांति पॉलिसी' (New Jeevan Shanti Policy) ची सुरुवात केली आहे. या पॉलिसीमधून मिळणारे पेंशन हीच या पॉलिसीची खासियत आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला आयुष्यभर दरमहिना पेन्शन मिळू शकते. यामुळे तुम्हाला रिटायरमेंट (Retirement) नंतरचं आयुष्य अत्यंत सहज घालवता येऊ शकतं. हा एक सिंगल प्रिमियम प्लान (Single Premium Plan) आहे. जीवन शांती पॉलिसीमध्ये तुम्ही 2 पर्याय स्विकारु शकता. पहिला आहे इमिजिएट एन्युटी आणि दुसरा आहे डेफर्ड एन्युटी.

इमिजिएट एन्युटीमध्ये पैसे गुंतवल्यास तात्काळ पेन्शनची सुविधा सुरु होते. तर दुसरीकडे डेफर्ड एन्युटीमध्ये पैसे गुंतवल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर पेन्शनची सुविधा मिळते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तात्काळ पेन्शनची सुविधा सुरु करु शकता किंवा नंतरही पेन्शन सुरु करु शकता.

तुमचं वय 40 वर्ष असेल आणि तुम्ही एकरकमी 10 लाख गुंतवले तर तुमच्याकडे 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर पेन्शन सुरु करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

LIC
तुमचा पगार आहे अनियमित पण बचत करायचीय? असे करा नियोजन

या योजनेत पेन्शनची रक्कम निश्चित नाही. तुमचं वय, गुंतवणुकीची रक्कम तसंच स्थगिती कालावधीवर अवलंबून आहे. यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डिफरमेंट पिरियड अर्थात स्थगिती कालावधी (गुंतवणूक आणि पेन्शन सुरु होण्यामधला अवधी) जितका जास्त किंवा जेवढं जास्त तुमचं वय तेवढीच पेन्शन तुम्हाला लागू होणार.

LIC यासाठी तुमच्या गुंतवणुकीवर टक्क्यांच्या आधारे पेन्शन देते. जसं तुमच्या 10 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनंतर पेन्शन सुरु करु इच्छिता, तर तुम्हाला 9.18 टक्क्यांच्या हिशेबाने वार्षिक 91,800 रुपयांची पेन्शन मिळू शकते.

LIC ची ही योजना कमीतकमी 30 वर्ष किंवा जास्तीत जास्त 85 वय असलेली व्यक्ती घेऊ शकते. जीवन शांती प्लानमध्ये लोन, पेन्शन सुरु व्हायच्या 1 वर्षांनंतर आणि सरेंडर पेन्शन सुरु होण्याच्या 3 महिन्यांनंतर करता येऊ शकते.

LIC
गृहिणींना व्यवसायाची संधी, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबाबत

तात्काळ आणि स्थगित अशा दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेण्याच्या वेळी वार्षिक दरांची हमी दिली जाते. या योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे वार्षिक पर्याय आणि वार्षिक परतफेड उपलब्ध आहे. एकदा जर तु्म्ही पर्याय स्विकारला तर तो पुन्हा बदलता येणार नाही. या योजनला ऑफलाईन सोबतच ऑनलाईनही खरेदी करता येऊ शकते. ही योजना LIC च्या जुन्या जीवन अक्षय योजनेसारखीच आहे.

5 ते 20 वर्षांच्या काळात, वेगवेगळ्या पेन्शन प्लॅनच्या अंतर्गत जीवन शांती प्लॅनमध्ये 8.79 आणि 21.6. टक्के वार्षिक हिशेबाने तुमच्या जमा पैशांवर पेन्शनचा पर्याय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com