‘एलआयसी’कडून हमीदराची पेन्शन योजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे - निश्‍चित हमी (गॅरंटेड) व्याजदराने तहहयात पेन्शन देणारी ‘जीवन शांती’ ही नवी पेन्शन योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) नुकतीच सुरू केली आहे. एकरकमी गुंतवणूक करून तहहयात पेन्शनसारखी रक्कम मिळणाऱ्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

‘‘सध्या आयुर्मान वाढत असून, भविष्यात बाजारातील व्याजदर किती राहतील, याबाबतही साशंकता आहे. हीच बाब लक्षात घेऊन ‘एलआयसी’ने ‘जीवन शांती’ ही नवी योजना सुरू केली आहे,’’ असे ‘एलआयसी’च्या पुणे विभागा(१)चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बरुण कुमार खाँ यांनी सांगितले.

या योजनेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘वयाची ३० वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला या योजनेत सहभागी होता येईल, किमान दीड लाख रुपयांपासून कितीही गुंतवणूक करता येणार आहे. गुंतवणुकीनंतर लगेच तसेच, १ ते २० वर्षांपर्यंतच्या प्रलंबित काळानंतर पेन्शन सुरू करण्याचा पर्याय आहे. योजनेत स्वतःबरोबरच जोडीदार, आई-वडिल, मुले किंवा नातवालाही सहभागी करून घेता येईल.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LIC Pension Scheme Varun Kumar