esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

मालामाल करतील हे स्टॉक्स; शॉर्ट टर्म शेअर्सचा लॉन्ग टर्म इन्कम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

- शिल्पा गुजर

Stocks Tips : सेठी फिनमार्टचे एमडी आणि मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी 3 शेअर्समध्ये खरेदी सल्ला दिला आहे. यापैकी एक शेअर एफ अँड ओचा (Future and Options) आहे आणि उर्वरित 2 शेअर्स कॅश मार्केटमधील आहेत. यामध्ये टाटा स्टील, कोचीन शिपयार्ड आणि लक्ष्मी ऑरगॅनिकचा समावेश आहे.

कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard)कोचीन शिपयार्ड ही भारतातली पहिली शिपयार्ड कंपनी आहे. ही कंपनी विमानवाहू युद्धनौकाही तयार करते. अलीकडे शिपिंग मार्केट जबरदस्त कामगिरी करत असल्याचे विकास सेठींनी सांगितले.कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard)सीएमपी (CMP) - 375.65 रुपयेलक्ष्य (Target) - 395 रुपयेस्टॉप लॉस (Stop Loss) - 365 रुपये कंपनीचे फंडामेंटल्स ?कंपनीची फंडामेंटल्स अत्यंत ठोस आहेत. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन (OPM) 30 टक्के आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही शिवाय चांगला लाभांश (Dividend) देते. कंपनीने गेल्या वर्षी 16.50 रुपये प्रति शेअर लाभांश दिला होता.

हेही वाचा: Life Insuranceबाबत स्मार्ट लोक देखील करतात 'या' कॉमन चुका!

लक्ष्मी ऑरगॅनिक (Laxmi Organic)
लक्ष्मी ऑरगॅनिकचेही फंडामेंटल्स अतिशय बळकट असल्याचे सेठींनी सांगितले. ही कंपनी फार्मा, ऑटो मोबाईलसह इतर क्षेत्रांसाठीही काम करते. केमिकल शेअर्समध्ये जोरदार तेजी असल्याने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला सेठींनी दिला आहे. या वर्षी जून तिमाहीत कंपनीला 107 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 21 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

लक्ष्मी ऑरगॅनिक (Laxmi Organic)
सीएमपी (CMP) - 559.60 रुपये
लक्ष्य (Target) - 585 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 545 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top