esakal | गुंतवणूकदारांचे किती लाख कोटी गेले पाण्यात पहा
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये सलग सात सत्रांत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी १३ लाख कोटी रुपये गमावले आहेत. सेन्सेक्‍स आज १५३ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार १४४ अंशांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे किती लाख कोटी गेले पाण्यात पहा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये सलग सात सत्रांत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी १३ लाख कोटी रुपये गमावले आहेत. सेन्सेक्‍स आज १५३ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार १४४ अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वारे पाहायला मिळाले. देशात कोरोना विषाणूचे नव्याने दोन रुग्ण आढळल्याने गुंतवणूकदार धास्तावले. त्यांनी विक्रीचा मारा सुरू केला. यामुळे सेन्सेक्‍समध्ये घसरण झाली. सेन्सेक्‍समध्ये सलग सात सत्रांत एकूण ३ हजार २५ अंशांची घसरण झाली असून, मे २०१९ नंतर सर्वाधिक काळ झालेली ही घसरण ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ६९ अंशांची घसरण होऊन ११ हजार १३२ अंशांवर बंद झाला.

loading image