खुशखबर! एलपीजी सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी कपात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : इंधनदरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने आज (शुक्रवार) अनुदानित घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) दरात 6.52 रुपये तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 133 रुपये कपात केली आहे. या दरकपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिल्लीत आज मध्यरात्रीपासून 14.2 किलोच्या अनुदानित एलपीजी सिलिंडरचा दर 507.42 रुपयांवरून 500.90 रुपयांवर आला. यापूर्वी जूनपासून सलग सहा महिने वाढ झाल्यानंतर आता ही दरकपात झाली आहे. तर विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात 133 रुपये कपात करण्यात आल्याने त्याचा दर 809 रुपयांवर गेला आहे. ग्राहकांना डिसेंबर महिन्यात एलपीजी सिलिंडरची खरेदी केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात 308.60 रुपये अनुदान जमा होईल. नोव्हेंबरमध्ये ही अनुदानाची रक्कम 433.66 रुपये होती.

सर्व ग्राहकांना बाजारभावाने एलपीजी सिलिंडर खरेदी करावे लागतात. सरकार वर्षाला 12 सिलिंडरसाठी ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करते. ही अनुदानाची रक्कम एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय दर आणि रुपयाचा विनिमय दर यावर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर एलपीजीचा दर वाढल्यास सरकार अनुदानाची रक्कम वाढविते आणि तो कमी झाल्यास अनुदानात कपात करण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LPG cylinders rates Reduced by Rs 7