esakal | LPG Cylinder Price: जाणून घ्या नव्या वर्षातील गॅस सिलिंडरचे नवे दर
sakal

बोलून बातमी शोधा

 lpg cyliner price

वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) विना अनुदानित गॅस 14.2 किलोग्रॅम सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. हा दर स्थिर असला तरी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 56 रुपयांनी वाढल्या आहेत.https://www.esakal.com/arthavishwa/eight-major-industrial-production-decreased-second-month-row-392149

LPG Cylinder Price: जाणून घ्या नव्या वर्षातील गॅस सिलिंडरचे नवे दर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

तेल कंपन्यांनी जानेवारीमधील गॅस सिलिंडरच्या किंमती जारी केल्या आहेत. वर्षाअखेर दोनवेळा दर वाढल्यानंतर नव्या वर्षात यात आणखी भर पडली आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) विना अनुदानित गॅस 14.2 किलोग्रॅम सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. हा दर स्थिर असला तरी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 56 रुपयांनी वाढल्या आहेत.

19 किलोग्रॅम गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या

- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये  19 किलो LPG गॅसची किंमत 1,332 रुपयांवरुन 1,349 रुपयेवर पोहचली आहे.   

चिंताजनक; प्रमुख आठ उद्योगांची सलग दुसऱ्या महिन्यात घसरण

- कोलकातामध्ये 19 किलो LPG सिलिंडर गॅससाठी आता पूर्वीच्या तुलनेत 22.50 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. या ठिकाणच्या किंमती 1,387.50 रुपयांवरुन 1,410 रुपयांवर पोहचल्या आहेत.  

- मुंबईमध्ये 19 किलो LPG सिलिंडरसाठी 1,280.50 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 1,297.50 रुपयात गॅस सिलिंडर मिळत होता. घरगुती वापरातील 14.2 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडरच्या किंमती 694 इतकी स्थिरच आहे. 

loading image