मुंबई विमानतळाची मालकी अदानी कंपनीकडे; कॅबिनेटची मंजुरी

Mumbai International Airport
Mumbai International Airport
Summary

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची (Mumbai International Airport Limited (MIAL)) मालकी अदानी एअरपोर्ट होल्डिंगला (Adani Airport Holdings) देण्यात आली आहे

मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची (Mumbai International Airport Limited (MIAL)) मालकी अदानी एअरपोर्ट होल्डिंगला (Adani Airport Holdings) देण्यात आली आहे. बुधवारी महाराष्ट्र कॅबिनेटने याबाबतचा ठराव स्वीकारला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. १ हजार १६० एकरवरील ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमी संपादनाचे कार्य पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या पहिल्या फेजमधील काम २०२३-२४ पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं आहे. (Maharashtra cabinet approves transferring Mumbai Airport's ownership to Adani Airport Holdings)

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या मालकीमध्ये बदल झाला आहे. GVK एअरपोर्ट डेव्हलपर्स एलटीडीकडे असणाऱ्या ५०.५ टक्के शेअरची खरेदी अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडून करण्यात आली आहे. त्यामुळे याची मालकी आता अदानी कंपनीकडे गेली आहे. मालकी बदलाचा प्रस्ताव केंद्र सरकार, सेबी आणि इतरांनी स्वीकारला आहे. CIDCO बोर्डानेही अशाच प्रकारचा ठराव मंजूर केला असल्याची माहिती सीएमओने दिली आहे.

Mumbai International Airport
सुपर व्हॅक्सिन! कोरोनाच्या सर्व व्हेरियंटना पुरुन उरणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट

आणखी एका निर्णयात कॅबिनेटने २८५ कोटी रुपयांच्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्टच्या पहिल्या फेजमधील कामाला मंजुरी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणापासून या प्रोजक्टची सुरुवात होणार आहे. सीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील आणि मराठवाडा विभागातील इतर तालुके या प्रोजेक्टमध्ये समावेश करुन घेण्यात येतील. राज्य पाणी संसाधन विभाग पश्चिमकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी गोदावरीमध्ये वळवण्यासाठीचा अभ्यास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com