महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी अंबानींनी केली 'एवढी' मदत 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मुकेश अंबानींनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीसाठी मदत केली आहे

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीसाठी 5 कोटी रुपयांची मदत केली आहे. मुकेश अंबानींचे सुपूत्र अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून शिक्षणापासून ते आरोग्य, कृषीसंदर्भातील अनेक विषयांवर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमाअंतर्गत 640 कोटी रुपये खर्च करण्यात येतात.

 सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनीसुद्धा मुख्यमंत्री मदतनिधीला 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून रिलायन्स आणि बिग बी यांचे आभार मानले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra CM Fadnavis thanks Reliance and Amitabh Bachchan for their contributions to relief fund