esakal | महिंद्राच्या नवीन एसयूव्ही 'थार'चं 4 दिवसांत 9 हजारांच्या वर बुकींग
sakal

बोलून बातमी शोधा

mahindra thar

महिंद्राची 'थार' ही स्पोर्ट युटिलीटी व्हेईकल 2 ऑक्टोबर 2020 ला लाँच झाल्यापासून चांगलीच प्रसिध्द होत आहे

महिंद्राच्या नवीन एसयूव्ही 'थार'चं 4 दिवसांत 9 हजारांच्या वर बुकींग

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: महिंद्राची 'थार' ही स्पोर्ट युटिलीटी व्हेईकल 2 ऑक्टोबर 2020 ला लाँच झाल्यापासून चांगलीच प्रसिध्द होत आहे. थारच्या बूकींगचा मोठा विक्रम झाला असून आतापर्यंत या गाडीचे 9 हजारांच्या वर बूकींग झाले आहेत. कोरोनाकाळातही महिंद्राच्या ह्या नवीन गाडीच्या विक्रीच्या उच्चांकावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थारची किंमत 9.80 लाखापासून सुरु आहे. 

कंपनीने 75 वा वर्धापनदिन साजरा करताना, बहुप्रतिक्षित असलेल्या थार एसयूव्ही या नवीन गाडी 2 तारखेला लॉंच केली होती. 9.80 लाखांपासून या गाडीची किंमत सुरु होत असून या गाडीची उच्चत्तम किंमत 13.75 लाख रुपये आहे. 

सध्या या गाडीची टेस्ट ड्रायव्हची सुविधा देशातील 18 शहरांमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. 10 ऑक्टोबरनंतर देशातील 100 शहरात महिंद्रा थारच्या टेस्ट ड्रायव्हची सुविधा दिली जाईल आणि संपुर्ण देशभरात 15 ऑक्टोबरपासून ही सोय असेल. थार विविध रंगात उपलब्ध असून दिवसेंदिवस याची बुकींग वाढून मागणी वाढत असल्याचे दिसत आहे.  

महिंद्राची नवीन एसयूव्ही थार ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनावर उपलब्ध असून पुढील महिन्यापासून खरेदीदारांना त्याचे वितरण सुरु होईल, अशी माहिती महिंद्रा ऍंड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी दिली आहे.