बघाच...! आनंद महिंद्रा आणत आहे नॅनो ट्रॅक्टर 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबई : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने आता टॉय ट्रॅक्टर बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. महिंद्राकडून लाँच करण्यात येणार सर्वात लहान ट्रॅक्टर असणार आहे. आनंद महिंद्रा या ट्रॅक्टरविषयी बोलताना म्हणाले, की तुम्ही कल्पना करु शकणार नाही, इतका लहान हा ट्रॅक्टर असणार आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. टॉय ट्रॅक्टर कृषी प्रधान देशात युवकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येत आहे. शेतीत युवकांचे योगदान मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असेही ते म्हणाले. 

शेतीत देशातील तरूण जे योगदान देत आहेत त्यांच्यासाठी नॅनो ट्रॅक्टर एक चांगली भेट ठरणार आहे. रिमोटच्या मदतीने नियंत्रित करता येणार असल्याने लांबून देखील ट्रॅक्टर वापरता येणार आहे.  12 व्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून 3 (फॉरवर्ड + रिव्हर्स) गिअर ट्रान्समिशन आहे. स्पीड लॉक फंक्शनदेखील या ट्रॅक्टरमध्ये समाविष्ट केले गेले आहे. आता ट्रॅक्टरच्या किंमतीविषयी सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे. 

सध्या ऑटो क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यावेळी बोलताना महिंद्रा म्हणाले की, वाहन उद्योगात मूलभूत बदल होत असून त्याचा फायदा घेण्याची वेळ आली आहे. कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर देणार असून येत्या दोन ते तीन वर्षात नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahindra Toy Ride on Tractor Electric remote-controlled tractor for budding agriculturist