तयार करूया ‘आर्थिक कुंडली’ 

मकरंद विपट 
Monday, 9 December 2019

एखादी व्यक्ती जेव्हा कमवायला लागते, तेव्हा तिने एखाद्या चांगल्या जाणकाराकडून म्हणजेच ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’कडून (सीएफपी) आपली आर्थिक कुंडली तयार करून घेतली पाहिजे.

एखादे मूल जन्माला आल्यावर आपण आपल्या शास्त्रानुसार त्याची सर्वप्रथम कुंडली किंवा पत्रिका तयार करून घेतो. जसे आपण या जन्मपत्रिकेला महत्त्व देतो, तसेच महत्त्व आता आर्थिक कुंडलीलाही देण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

एखादी व्यक्ती जेव्हा कमवायला लागते, तेव्हा तिने एखाद्या चांगल्या जाणकाराकडून म्हणजेच ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’कडून (सीएफपी) आपली आर्थिक कुंडली तयार करून घेतली पाहिजे. अशा कुंडलीचे बरेच फायदे आयुष्यात होतात. यामुळे आपल्याला आपले आर्थिक नियोजन करायला खूप मदत होते. जसे आपण आपल्या जन्मपत्रिकेतील दोष नाहीसे करण्यासाठी विशिष्ट उपाय करतो; त्याचप्रमाणे काही ठरावीक कालावधीनंतर आपली आर्थिक कुंडली संबंधित जाणकारांना दाखवून त्यात गरजेनुसार बदल करून घेतले पाहिजेत. 

हेही वाचा : शेवटच्या टप्प्यात  कशी कराल करबचत 

आर्थिक कुंडलीचे आणखी काही फायदे पुढीलप्रमाणे - 
 आपल्याला आपले अनावश्‍यक खर्च टाळता येऊ शकतात. त्याच्या बदल्यात निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी गुंतवणूक करता येऊ शकते. 

 आपले कर्ज लवकर संपून ‘ईएमआय’ थांबविण्याचा विचार करता येतो. थोडक्‍यात, कर्जमुक्त आयुष्य जगण्यास मदत होते. 

 चुकीच्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्यास मदत होते आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपण परतावा वाढवू शकतो. 

 आपली किती गुंतवणूक नक्की कोठे केली पाहिजे, ते कळते. 

 भावनिक विचार करण्यापेक्षा योग्य तो विचार करायला उपयोग होतो, जे आर्थिक नियोजनात महत्त्वाचे असते. 

 अल्प, मध्यम आणि दीर्घ कालावधीची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. 

 करबचतीचे नियोजनही योग्य प्रकारे करता येऊ शकते. 

अशी कुंडली बनविण्यासाठी ‘सीएफपीं’ची मदत घेतली, तर चुका होण्याची शक्‍यता मावळते. तेव्हा लवकरच तुमची आर्थिक कुंडली तयार करून घ्या आणि आपली आर्थिक उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makrand vipat article Financial planning