esakal | पुण्यात मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडचे नवीन दालन खुले होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Malabar Gold & Diamonds to open new showroom in Pune,

पुण्यात मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडचे नवीन दालन खुले होणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 30 : आकर्षक दागिने आणि आभूषणांसाठी प्रसिद्ध मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडच्या नवीन दालनाचे पुण्यात 3 नोव्हेंबरला उद्‌घाटन करण्यात येणार आहे. मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडचा ब्रॅंड ऍम्बेसेडर आणि बॉलिवूडचे अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते हे दालन खुले होणार आहे. महाराष्ट्रातील मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडचे हे 6 वे दालन असणार आहे. 

नवीन दालनाच्या निमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांना 15 हजार रुपयांच्या सोनेखरेदीवर एक सोन्याचे नाणे, तर 15 हजार रुपयांच्या डायमंड खरेदीवर दोन सोन्याची नाणी दिली जाणार आहेत. तसेच, सोन्याच्या भावात होणारे चढ-उतार बघता या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 10 टक्के रक्कम देऊन "ऍडव्हान्स बुकिंग'चा पर्यायदेखील ग्राहकांना देण्यात आला आहे. 

या दालनात आधुनिक, स्टाइलिश, पारंपरिक तसेच समकालीन डिझाइनर दागिन्यांचा मोठा समावेश असणार आहे. दागिने आणि डायमंडच्या शुद्धतेची खात्री देणारे बीआयएस हॉलमार्क, तसेच माइन ब्रॅंडचा ठसा यावर असणार आहे. ज्यामध्ये 28 प्रकारच्या गुणवत्तेच्या विविध तपासणी केल्या जातात आणि त्यानंतर जीआयए, आयजीआय प्रमाणपत्र दिले जाते. दालनाच्या खास वैशिष्ट्यांमध्ये इरा अनकट डायमंड ज्वेलरी, प्रेशिया जेम/ रत्न ज्वेलरी, डिव्हाइन ब्रॅंडअंतर्गत भारतीय हेरिटेजची परंपरा असलेली डिझाइन्स, एथनिक्‍स ब्रॅण्ड अंतर्गत हस्तकलेचे डिझाइनर दागिने आणि मुलांसाठी स्टारलेट डिझाइनचा यामध्ये समावेश आहे. 

मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, की "आमचा समूह व्यवसायातील तत्त्वे आणि मूल्ये जपत असून पारदर्शकता, प्रामाणिकपणाचे पालन, इतरांपेक्षा चांगल्या सेवांसह गुणवत्ता प्रदान करतो. तसेच, प्रत्येक वयोगटातील ग्राहकांच्या आवडीनुसार अनुकूल असलेल्या उत्पादनांच्या रचनेमुळे जागतिक पातळीवर वेगळेपण सिद्ध करतो.' 

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड जागतिक स्तरावरील सुविधा आणि उत्पादनांबरोबरच दागिन्यांची आयुष्यभराची देखभाल, एक वर्षाचा विनामूल्य विमा, सोन्याच्या एक्‍स्चेंजसाठी शून्य कपात आणि सर्व दागिन्यांसाठी "बायबॅक गॅरंटी' अशा विविध सुविधा दिल्या जातात. 

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड हा एक नावाजलेला ब्रॅंड असून तब्बल 10 देशांत 250 दालने कार्यरत आहेत. कंपनीच्या एकूण नफ्यातील पाच टक्के हिस्सा शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण आणि गरीब आणि पर्यावरणीय संरक्षण अशा समाजकल्याण कार्यांसाठी दिला जातो.