मॅनकाइंड फार्मा आयपीओ आणायच्या तयारीत!

Mankind Pharma plans IPO with $8 billion valuation
Mankind Pharma plans IPO with $8 billion valuation

भारतातील सर्वात मोठ्या अनलिस्टेड फार्मा कंपन्यांपैकी एक असलेल्या क्रिसकॅपिटलची (ChrysCapital) गुंतवणूक असलेल्या मॅनकाइंड फार्माने (Mankind Pharma) 2022 मध्ये मेगा IPO लॉन्च करण्यासाठी गुंतवणूक बँकर्सशी चर्चा सुरू केली आहे. अद्याप त्यांनी अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही, आम्ही सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती देत आहोत. मॅनकाइंड फार्मा मॅनफोर्स कंडोम्स (Manforce Condoms), कॅलोरी 1 (Kaloree 1) आणि प्रेगा न्यूजसारखे (Prega News) प्रॉडक्ट्स बनवते.

Mankind Pharma plans IPO with $8 billion valuation
डिमर्जरच्या घोषणेनंतर Saregama Indiaच्या स्टॉकने हीट केलं अप्पर सर्किट!

मॅनकाइंड फार्माच्या प्रस्तावित IPO वर या आठवड्याच्या सुरुवातीला चर्चा सुरू झाल्याचे सुत्रांनी सांगितले. वाटाघाटी सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत आणि यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना आंशिक एक्झिट मिळेल, जे दिलेल्या मुदतीत परताव्याची अपेक्षा करत आहेत असेही सुत्रांकडून समजत आहे.

मॅनकाइंड फार्मा कंपनीमध्ये क्रिसकॅपिटल व्यतिरिक्त कॅपिटल इंटरनॅशनल आणि सिंगापूरच्या GIC यांचीही गुंतवणूक आहे. 2015 मध्ये, कॅपिटल इंटरनॅशनलने क्रिसकॅपिटलकडून मॅनकाइंड फार्मामधील 11 टक्के स्टेक 20 कोटी डॉलर्सना विकत घेतले. एप्रिल 2018 मध्ये, क्रिसकॅपिटलच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने पुनरागमन केले, कंपनीतील 10 टक्के भागभांडवल 35 कोटी डॉलरमध्ये विकत घेतले. कंसोर्टियममध्ये GIC आणि CPPIB यांचा समावेश होता.

Mankind Pharma plans IPO with $8 billion valuation
DFM फूड्सच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ

मॅनकाइंड फार्माचे व्हॅल्युएशन 8-10 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान असू शकते असेही एका सुत्राने सांगितले. ही एक कॅश रिच कंपनी आहे आणि हा IPO प्रामुख्याने विक्रीसाठी ऑफर (OFS) असू शकतो.

वेगाने वाढणाऱ्या कंपनीचा आकाराही वाढला आहे आणि लिस्टींगसाठी तयार आहे. या करारासाठी इनव्हेस्टमेंट बँकर्सचा सिंडिकेट एप्रिलमध्ये निश्चित केला जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com