बँकेत Joint Savings Account उघडण्याचे अनेक फायदे, काय आहेत नियम, सुविधा? | Banking News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकेत Joint Savings Account उघडण्याचे अनेक फायदे, काय आहेत नियम, सुविधा?

बँकेत Joint Savings Account उघडण्याचे अनेक फायदे, काय आहेत नियम, सुविधा?

बँक खाते, जे 2 किंवा अधिक लोक एकत्र उघडू शकतात, त्याला जॉईंट अकाऊंट (Joint Account) म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार (RBI), या प्रकारच्या बँक अकाऊंटमधील (Bank Account) खाते बिझनेस पार्टनर ( Business Partner), जोडीदार (Life Partner) किंवा कुटुंबातील सदस्य (Family Member) एकत्र उघडू शकतात. यामध्ये खातेदारांच्या (Account Holder) नावे डेबिट कार्ड (Debit Card)जारी केले जाऊ शकते. याशिवाय कोणताही खातेदार या खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो. जॉईंट अकाऊंट हे सामान्य अकाऊंटसारखे असते जे 2 प्रकारचे असू शकते. कायम किंवा तात्पुरते. जेव्हा 2 लोकांपैकी एकाचा मृत्यू होतो, तेव्हा दुसरी व्यक्ती ते ऑपरेट करू शकते. (Many benefits of opening a Joint Savings Account in a bank, what are the rules facilities)

एनिवन किंवा सर्वायव्हर (Anyone or Survivor)

जेव्हा दोन लोक जॉईंट अकाऊंट उघडतात तेव्हा अशा प्रकारचे खाते उघडले जाते. हे खाते 2 पेक्षा जास्त लोक एकत्रितपणे उघडू शकतात. यापैकी कोणताही ठेवीदार कधीही खात्याचा वापर करू शकतो.

फॉर्मर किंवा सर्वायव्हर (Former or Survivor)

यामध्ये फक्त पहिला खातेदारच खाते वापरू शकतो. पहिल्या खातेदाराच्या मृत्यूनंतरच दुसरी व्यक्ती त्याचा वापर करू शकते. मात्र यासाठी मृत्यू प्रमाणपत्रासारखी काही महत्त्वाची कागदपत्रेही देणे आवश्यक आहे.

मायनर अकाउंट (Minor Account)

लहान मुलांसाठीही बँक खाते उघडता येते. हे खाते पालकांसह संयुक्तपणे उघडले जाते. यामध्ये पालक अल्पवयीन मुलाच्या वतीने खाते वापरतात.

Web Title: Many Benefits Of Opening A Joint Savings Account In A Bank What Are The Rules Facilities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top