बाजारात पुन्हा घसरणीची साथ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

‘कोरोना’ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महामंदी येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.

मुंबई - ‘कोरोना’ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महामंदी येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयएमएफच्या मते, विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाल्याने सकाळपासूनच विक्रीचा मारा सुरू केला. दिवसअखेर सेन्सेक्स १३७५ अंशांच्या घसरणीसह २८ हजार ४४० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ३७९ अंशांची घसरण झाली. तो ८ हजार २८१ अंशांवर स्थिरावला. रशिया आणि सौदी अरेबियामध्ये तेल दर युद्ध सुरूच असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत ६.५८ टक्क्यांची घसरण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the market falling again