esakal | शेअर बाजाराची गटांगळी; कोट्यवधींचा चुराडा...
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजाराची गटांगळी; कोट्यवधींचा चुराडा...

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला जागतिक पातळीवर 'साथीचा रोग' म्हणून जाहीर केल्यानंतर शेअर बाजार गुंतवणूकदारांची भीतीने धांदल उडाली आहे

शेअर बाजाराची गटांगळी; कोट्यवधींचा चुराडा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला जागतिक पातळीवर 'साथीचा रोग' म्हणून जाहीर केल्यानंतर शेअर बाजार गुंतवणूकदारांची भीतीने धांदल उडाली आहे. भारतीय शेअर बाजाराने गटांगळी खाल्ली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 2700 अंशांनी कोसळून 32,990 वर पोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी देखील 780 अंशांनी घसरून 9,648 पर्यंत खाली आला आहे. परिणामी अवघ्या दोन तासात ११ लाख कोटी रुपये गमवावे लागल्याने शेअर बाजार गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा जगभरात तब्बल 122 देशांमध्ये फैलाव झाला आहे. परिणामी लाखो लोक प्रभावित होऊन आतापर्यंत  4,630 लोकांनां आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान भारतात देखील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 62 वर पोचली आहे.

दरम्यान सकाळच्या सत्रात सर्वच क्षेत्रांमधील शेअरची धूळधाण उडाली असून क्षेत्रनिहाय सार्वजनिक बँका, मीडिया, धातू ऑटो कंपन्यांचा निर्देशांक घसरणीत आघाडीवर आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी खालोखाल महत्वपूर्ण मानला जाणारा बँक निफ्टी निर्देशांक तब्बल 2300 अंशांनी घसरून 24,013 वर व्यवहार करत आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सच्या पातळीवर ऍक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प आणि एसबीआय तब्बल 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. तर हेवीवेट समजले जाणारे एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस हे शेअर देखील मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज बाजारात देखील सोने, चांदी सहित सर्वच धातू आणि कच्चे तेल मोठ्या प्रमाणात घसरून व्यवहार करत आहे.

जागतिक पातळीवर, अमेरिकी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशक देखील तब्बल 5 टक्क्यांपर्यंत घसरून बंद झाले. तर चीनमधील शांघाई (1.34 ) हॉंगकॉंग (3.66 ), दक्षिण कोरियाई सेऊल (4.29) तर जापनीज टोकियो र्निदेशांक  5.32 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहेत. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत तब्बल 0.53 पैशानी घसरून 74.17 वर व्यवहार करत आहे.