आनंदाची बातमी: 'या' कंपनीने केली वाहनांच्या किंमतीत भरघोस कपात

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली: नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आघाडीची ऑटो कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने वाहनांच्या किंमती कपात जाहीर केली आहे. मारुती सुझुकीने ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, व्हिटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या वाहनांच्या किंमतीत कपात जाहीर केली. विशिष्ट मॉडेलच्या किंमती कंपनीने 5 हजार रुपयांनी कमी केल्या आहेत. मात्र अन्य कार्स आणि डिझायर, स्विफ्ट व बलेनोच्या पेट्रोल मॉडेलच्या किंमतीत कपात करण्यात आलेली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

नवीन दर आजपासून (दि.25)  लगेच लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपात केल्यामुळे आता वाहन कंपन्यांनी देखील याचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. आता इतर कंपन्यांकडून देखील वाहनांच्या किंमती कपात केली जाण्याची शक्यता आहे. आगामी सणासुदीचा काळ बघता वाहन विक्रीत वाढ होण्याची आशा वाहन कंपन्या व्यक्त करीत आहे. 

आज मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचा शेअर 5.25 टक्क्यांच्या म्हणजेच 368 रुपयांच्या घसरणीसह 6641 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 2 लाख 01 हजार 146 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti Suzuki cuts car prices, days after govt slashes corporate tax