एम. डी. मुकेश अंबानी यांना रिलायन्स मधे वीस वर्षे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani

रिलायन्स इंडस्ट्रीजचे एम.डी. व सी.ई.ओ. म्हणून मुकेश अंबानी यांना आज वीस वर्षे पूर्ण झाली.

Mukesh Ambani : एम. डी. मुकेश अंबानी यांना रिलायन्स मधे वीस वर्षे पूर्ण

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे एम.डी. व सी.ई.ओ. म्हणून मुकेश अंबानी यांना आज वीस वर्षे पूर्ण झाली. या काळात कंपनीने उलाढाल, निव्वळ नफा, विस्तार आणि बाजार मूल्य या सर्व आघाड्यांवर भरीव प्रगती केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्च २०२२ मधील भांडवली बाजार मूल्य १८ लाख कोटींच्या आसपास आले आहे. तर महसूलही आठ लाख कोटींच्या जवळपास आला आहे. या आर्थिक वर्षाचा त्यांचा निव्वळ नफा ६८ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यांची यावर्षीची निर्यात अडीच लाख कोटींच्या पेक्षा जास्त आहे. त्यांची या आर्थिक वर्षातील मालमत्ताही १५लाख कोटींच्या आसपास आली आहे.

या दोन दशकांत रिलायन्सने परंपरागत पेट्रोकेमिकल्स चा व्यवसाय वाढत नेताना रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेल या नव्या व्यवसायांमध्येही पदार्पण केले. आता त्यांचे जामनगरचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तर जगातील सर्वात मोठे पेट्रोकेमिकल्स संकुल म्हणून ओळखले जाते.

नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशनने समाजसेवेच्या क्षेत्रातही मोठी आघाडी घेऊन सव्वा सहा कोटी भारतीयांचे जीवनमान बदलले आहे. त्यांनी ग्रामीण आणि महिला सक्षमीकरण, पोषक आहार, पर्यावरण संतुलन, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे सीएसआर मधून केलेले उपक्रम हे भारतातील सर्वात मोठे असल्याचे सांगितले जाते. तर त्यांच्या जिओ वर्ल्ड संकुलात पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र होणार आहे. २०३५ मध्ये प्रदूषण मुक्त कामकाज करण्याचा निर्धारही कंपनीने केला आहे.