म्युच्युअल फंडाच्या गंगाजळी पुन्हा 25 लाख कोटींवर 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

मुंबई: म्युच्युअल फंडाच्या गंगाजळीने पुन्हा एकदा 25 लाख कोटींची पातळी गाठली आहे. इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंडांमधील योगदान वाढल्याने गंगाजळी 25.43 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2019 अखेर देशातील सर्व म्युच्युअल फंडांकडील गुंतवणूकयोग्य गंगाजळी (एयूएम) 25.27 लाख कोटी रुपये होती, ती आता मे  महिन्यात 25.43 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंडात सरलेल्या महिन्यात 5410 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याने मिड आणि स्मॉल कॅप फंडांना बळ मिळाले आहे. परिणामी 5410 कोटी रुपयांपैकी मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये 2700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मनी मार्केट/लिक्विड फंडांमध्ये मे महिन्यात 72500 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर त्या आधीच्या एप्रिल महिन्यात 96200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.  

इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंड: 5410 कोटी रुपये 
ओव्हरनाइट फंड: 2350 कोटी रुपये 
हायब्रीड फंड: 1270 कोटी रुपये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MF assets rise to ₹25.43 trillion in May