ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टेक लीडर होण्यास MG Motors India सज्ज; Jio सोबत करार

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टेक लीडर होण्यास MG Motors India सज्ज; Jio सोबत करार
Summary

MG Motors कडून करण्यात आलेला हा करार हा इंटरनेट टेकनॉलॉजिसाठी करण्यात आला आहे.

MG Motors and Reliance Jio Partnership: MG मोटर्स इंडिया ने त्यांच्या येणाऱ्या मिड साईझ SUV गाड्यांमधील loT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स साठी भारतातील तगड्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी जिओ इंडियासोबत (Jio India) एक महत्त्वपूर्ण करार केलाय. एम जी मोटर्स इंडिया ने याबाबत माहिती दिली. MG Motors कडून करण्यात आलेला हा करार हा इंटरनेट टेकनॉलॉजिसाठी करण्यात आला आहे.

टेक लीडर बनण्यास तयार :

जिओच्या व्यापक इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे येणाऱ्या काळात MG Motors च्या मध्यम आकाराच्या SUV गाड्या घेणाऱ्या ग्राहकांना केवळ मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर लहान शहरं आणि ग्रामीण भागात देखील इंटरनेटचा उत्तम अबुधाव घेता येणार आहे. एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले की, "ऑटोमोबाईल उद्योगात तंत्रज्ञानासोबत नावीन्यता जोडलेल्या कार्सच्या स्पेसमध्ये आम्ही आघाडीवर आहोत. सध्याचा कल सॉफ्टवेअरवर आधारित उपकरणांवर केंद्रित आहे. जिओ सारख्या मोठ्या टेक इनोव्हेटर कंपनीसोबत केलेल्या भागीदारीनंतर एमजी मोटर्सला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये टेक लीडर होण्यास एम जी मोटर्स तयार असल्याचं ते म्हणालेत.

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टेक लीडर होण्यास MG Motors India सज्ज; Jio सोबत करार
आर्थिक नियोजनात फायद्याच्या ठरणाऱ्या ६ गोष्टी, जाणून घ्या

पुढे राजीव चाबा म्हणाले की, "Jio सोबत केलेल्या भागीदारीमुळे आगामी काळात कंपनीकडून बाजारात येणाऱ्या मध्यम आकाराच्या SUV कनेक्टेड कार्सच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम कनेक्टिव्हिटी आणि उत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळण्यास मदत होणार आहे."

ग्राहकांना देणार उत्तम तंत्रज्ञान आणि उत्पादने

याबाबत कराराबाबत जिओ कडून देखील भाष्य करण्यात आलं आहे. जिओचे संचालक आणि अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले की, " जिओ भारतीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आणि उत्पादने कायम विकासाठी करत आली आहे. एमजी मोटर्स इंडियासोबत आमची भागीदारी ही आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे. या कराराच्या माध्यमातून ग्राहकांच्या माहिती आणि मनोरंजनासाठी eSIM, IOT आणि स्ट्रीमिंग सोल्यूशन देण्यात येणार आहे. MG Motors ची नवीन मिड साईझ SUV ही या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये बाजारात येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com