एमजी मोटर्सने सादर केली पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

भारतात सर्वप्रथम इंटरनेट गाडी (अँड्रॅाईड कार) सादर केलेल्या एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर इंडिया या वाहनकपंनीने ही आपल्या इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.

नवी दिल्ली, ता. ५ : वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या समस्यांवर मात देण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक गाड्या तयार करण्याचे भारतातील सर्वच कंपन्यांनी सुरु केले असतानाच भारतात सर्वप्रथम इंटरनेट गाडी (अँड्रॅाईड कार) सादर केलेल्या एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर इंडिया या वाहनकपंनीने ही आपल्या इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.

इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असणारी 'झेडएस ईव्ही' ही भारतात सादर करण्यात आलेली सर्वात पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 5) या नव्या 'झेडएस ईव्ही'चे अनावरण नवी दिल्ली येथे झाले.

दरम्यान ही नवीन एसयूव्ही ही बॅटरी चार्जवर चालत असून गाडीची बॅटरी संपूर्ण चार्ज असल्यास गाडी जवळपास ३४० किमीचा प्रवास करु शकते. तसेच गाडीचे इंजिन ३५३ एनएम इन्स्टंट टॉर्क आणि १४३ पीएस पॉवर देते व स्थिर अवस्थेतून केवळ ८.५ सेकंदात ताशी १०० किमी गती प्राप्त करून देण्याची क्षमता ही गाडीच्या इंजिनमध्ये असल्याती माहिती कंपनीने दिली आहे. 

web title : MG Motors introduced the first electric Internet SUV


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MG Motors introduced the first electric Internet SUV