तुमच्या स्मार्टफोनमध्ये 'हा' व्हायरस तर नाही ना? बघा लिस्ट

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

 स्मार्टफोनला बगचा धोका आहे. यात तुम्ही वापरात असलेल्या स्मार्टफोनचा तर समावेश नाही ना?

मुंबईः स्मार्टफोनमध्ये एका व्हायरसने प्रवेश केल्याने स्मार्टफोनधारकांची झोप उडवली आहे. क्वॉलकॉम प्रोसेसर असलेल्या अँड्रोइड स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये  'कॉलपॉन' या बगने प्रवेश केला आहे. 'कॉलपॉन' हा एक बग असून त्याच्या मदतीने हॅकर्स अँड्रोइड स्मार्टफोनमध्ये डोकावू शकणार आहेत तुमची खासगी किंवा आर्थिक महत्त्वाची माहिती हॅकर्सच्या हाती लागण्याची शक्यता आहे.  हॅकर्स आणि युजर जर एकच वायफाय वापरत असतील तर फोन हॅक होण्याची शक्यता अधिक आहे. या बगमुळे हॅकर WLAN आणि मॉडेमसोबत ओव्हर - इअर (ओटीए)च्या मदतीने हॅक करु शकतात. 

बगमुळे आता स्मार्टफोनधारकांची झोप उडाली आहे. तीन बग मिळून एक 'कॉलपॉन' तयार करण्यात आला आहे. आता मात्र क्वॉलकॉम आणि गुगलच्या अँड्रोइड सिक्युरिटी टीमला या बगबाबत कळवण्यात आले आहे. 

संशोधकांनी गुगल पिक्सल 2 आणि पिक्सल 3 या स्मार्टफोनवर या बगची चाचणी केली होती. या चाचणीनंतर क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनला या व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे. 'क्वॉलकॉमनं नेहमीच युजर्सची सिक्युरिटी आणि प्रायव्हसीला प्राधान्य दिले आहे. 

क्वॉलकॉम कंपनी जगभरातील अनेक स्मार्टफोन कंपन्यांना प्रोसेसर पुरवण्याचे काम करते. बऱ्याच स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचे प्रोसेसर वापरले जाते. सध्याच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये  क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855, 845, 710, 675 आणि अन्य प्रोसेसर आहेत. त्यामुळे अशा स्मार्टफोनधारकांना बगचा धोका आहे. कंपनीने तसे अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. यात तुम्ही वापरात असलेल्या स्मार्टफोनचा समावेश नाही ना? 

 स्मार्टफोनधारकांनी काय करावे? 
 स्मार्टफोनधारकांनी फोन अपडेट केल्याने या बगचा धोका टळू शकतो. 

- वनप्लस 7 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- वनप्लस 7 प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- ओप्पो रेनो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- आसुस 6जेड (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- वीवो नेक्स (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- एमआई ए2 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660) 
- रेडमी नोट 7 प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675) 
- रेडमी 6 प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन636) 
- वीवो वी15 प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675) 
- सॅमसंग  ए70 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675) 
- सॅमसंग   एम40 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675) 
- नूबिया रेड मॅजिक 3 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- ब्लॅक शार्क 2 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- रेडमी के20 प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855) 
- वनप्लस 6टी क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- गुगल पिक्सल 3 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- गुगल पिक्सल 3एक्सएल (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- वनप्लस 6 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- रिअलमी एक्स (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन710) 
- गुगल पिक्सल 3ए एक्सएल (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670) 
- गुगल पिक्सल 3ए (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670) 
- शाओमी पोको एफ1 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- नोकिया ८ Sirocco (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835) 
- वीवो जेड१ प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712) 
- आसुस जेनफोन 5जेड (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- रेडमी के२० (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730) 
- रेडमी नोट ५ प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636) 
- नोकिया 6.1 प्लस (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636) 
- एलजी वी30+ (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845) 
- एलजी जी7 थिंक (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन845) 
- आसुस मैक्स प्रो एम2 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660) 
- आसुस मैक्स प्रो एम1 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636) 
- ओप्पो आर17 प्रो (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710) 
- नोकिया 8.1 (क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of Android Smartphones Vulnerable to Trio of Qualcomm Bugs