esakal | मॉबिक्विक आणणार आयपीओ; १,९०० कोटी रुपयांच्या आयपीओला सेबीची मंजुरी | Mobikwik
sakal

बोलून बातमी शोधा

mobikwik

मॉबिक्विक आणणार आयपीओ; १,९०० कोटी रुपयांच्या आयपीओला सेबीची मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील अनेक कंपन्या (company) सध्या आपला आयपीओ (IPO) आणत आहेत. त्यात आता डिजिटल पेमेंट (Digital payment) कंपनी मोबिक्विकचीही (mobikwik) भर पडली आहे. मोबिक्विक आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. सेबीकडून (SEBI) मोबिक्विकच्या १ हजार ९०० कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा: दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही - सुप्रिया सुळे

मोबिक्विक दिवाळीपूर्वी आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. गुरुग्राममधील या कंपनीने जुलैमध्ये सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला होता. मॉबिक्विकने आपल्या दस्तावेजांमध्ये सांगितले की, डिजिटल पेमेंट्स, ऑनलाईन शॉपिंग आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने त्यांच्या व्यवसायाला फायदा होईल. या आयपीओद्वारे कंपनी १ हजार ९०० कोटी रुपये जमा करणार आहे.

यात १ हजार ५०० कोटी रुपयांचे नवे शेअर आणले जाणार आहेत आणि ४०० कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल सध्याच्या गुंतवणूकदारांसाठी असतील. मोबिक्विकने मागील महिन्यात अबुधाबी इनवेस्टमेंट अथॉरिटीकडून २ कोटी डॉलरचा निधी मिळवला होता. मागील आर्थिक वर्षात मोबिक्विकचे एकूण उत्पन्न १८ टक्क्यांनी कमी होऊन ३०२ कोटी रुपये झाले होते. त्यांचा तोटा १२ टक्क्यांनी वाढून १११ कोटी रुपये झाला होता.

loading image
go to top