esakal | MobiKwik आणणार 1900 कोटींचा IPO, SEBI ची मंजुरी| Share Market News
sakal

बोलून बातमी शोधा

MobiKwik आणणार 1900 कोटींचा IPO, SEBIची मंजुरी

डिजिटल पेमेंट कंपनी मोबिक्विकच्या (MobiKwik) आयपीओचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) कंपनीच्या आयपीओसाठी मान्यता दिली आहे.

MobiKwik आणणार 1900 कोटींचा IPO, SEBIची मंजुरी

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

- शिल्पा गुजर

MobiKwik IPO: डिजिटल पेमेंट कंपनी मोबिक्विकच्या (MobiKwik) आयपीओसाठी मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (सेबी) कंपनीच्या आयपीओला मंजुरी दिल्याची माहिती बँकिंग सुत्रांकडून मिळाली. मोबीक्विकने IPO द्वारे 1900 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. मोबिक्विकने जुलैमध्ये सेबीकडे कागदपत्रे (DRHP) सादर केली होती. दिवाळीपर्यंत आयपीओ येऊ शकतो. मोबिक्विकने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा: बीआरटी मार्गात पीएमपीएलच्या बसची नेहमीच शर्यत

1500 कोटी नवीन इक्विटी शेअर्स


मोबिक्विकचा आयपीओ 1900 कोटींचा असेल. यापैकी 1500 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. 400 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) असेल, ज्यामुळे प्रवर्तक (Promoters) आणि विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे भागभांडवल कमी करतील. अमेरिकन एक्सप्रेस ट्रॅव्हल रिलेटेड सर्व्हिसेस कंपनी, बजाज फायनान्स, सिस्को सिस्टीम्स (USA) पीटीई लि., सेक्वॉया कॅपिटल इंडिया इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स III (Sequoia Capital India Investment Holdings III), सेक्विया कॅपिटल इंडिया इन्व्हेस्टमेंट IV (Sequoia Capital India Investments IV), ट्री लाइन एशिया मास्टर फंड (सिंगापूर) पीटीई लिमिटेड (Tree Line Asia Master Fund (Singapore) Pte Ltd) आणि कंपनीचे प्रवर्तक (Promoters) उपासना टाकू आणि बिपीन प्रीत सिंग आयपीओमधील शेअर्स विकतील.

आयपीओमधून मिळणारी रक्कम सेंद्रिय आणि अजैविक (Organic and Inorganic) वाढीसाठी वापरली जाणार आहे. या व्यतिरिक्त, काही निधी कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल. वन मोबिक्विक सिस्टीम हे भारतातील आघाडीचे मोबाईल वॉलेट (MobiKwik Wallet) आणि आता खरेदी करा नंतर (बीएनपीएल) म्हणजे Buy Now Pay Later (BNPL) प्लेअर आहे.

हेही वाचा: पुणे : मगर महाविद्यालयात प्रौढांसाठी टेबल-टेनिस स्पर्धेचे आयोजन

कंपनीचे लक्ष काय ?
आधी खरेदी मग पैसै भरा या सुविधेसह वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन व्यवहारात क्रेडिटच्या गरजा पूर्ण करण्यावर कंपनी भर देत आहे. त्याच्या लिस्टिंगला कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या ईएसओपींकडून भरघोस बक्षीस मिळतील असे मोबिक्विकने म्हटले होते. कंपनीने ईएसओपी 2014 योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी 45 लाख इक्विटी शेअर्स आरक्षित केले आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top