esakal | Moody's नं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिले चांगले संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Moodys

Moody's नं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिले चांगले संकेत

sakal_logo
By
सुधीर काकडे

ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या (Moodys) अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक बदल दिसून आले आहेत. मूडीजच्या नुकत्याच समोर आलेल्या या अहवालात भारत 'निगेटीव्ह' मधून रेटिंगच्या 'स्टेबल' श्रेणीमध्ये आल्याचे दिसते आहे. त्यामुळे कोरोना काळात डबघाईला आलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येते आहे.

मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 'बाजारात भांडवलाची उपलब्धता आणि व्यवहारात तरलता चांगली आहे. त्यामुळेच बँक, बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांना वित्तीय जोखीम कमी आहे. त्यामुळे आता भारताच्या अर्थव्यवस्थेला मूडीजच्या आधीच्या अहवालातील रेटिंगपेक्षा यावेळी चांगले रेटिंग मिळाले आहेत.

हेही वाचा: सोने-चांदी महागले; आणखी भाव वाढण्याचे संकेत

देशातील प्रमुख क्रेडिट स्ट्रेंथ रेटिंग Baa3 स्तरावर ठेवत मूडीजने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपला दृष्टिकोन बदल्याचे दिसते आहे. यामुळे वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारताला ओळखले जाणार आहे. ज्या अर्थव्यवस्थेत उच्च वाढीची क्षमता आणि सरकारी कर्जासाठी स्थिर स्थानिक वित्तपुरवठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या काही धोके शिल्लक असल्याचे देखील मूडीजने सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे कर्जाचे ओझे अजूनही जास्त आहे. तरी देशाची आर्थिक स्थिती सरकारला येत्या काही वर्षांत सामान्य वित्तीय तोट्यातून सावरण्याची संधी देईल अशी शक्यता आहे.

loading image
go to top