इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या वर्षभरात झाली दुप्पट

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. 2018 मध्ये इन्फोसिससाठी भारतातून काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या 30 होती. त्यांचे वार्षिक वेतन 1.02 कोटी रुपये होते. त्यानंतर 2018-19 या सरलेल्या आर्थिक वर्षात त्यांची संख्या 64 वर पोचली आहे.

बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. 2018 मध्ये इन्फोसिससाठी भारतातून काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या 30 होती. त्यांचे वार्षिक वेतन 1.02 कोटी रुपये होते. त्यानंतर 2018-19 या सरलेल्या आर्थिक वर्षात त्यांची संख्या 64 वर पोचली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा समावेश महत्त्वाच्या मॅनेजर श्रेणीत नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनातसुद्धा भरघोस वाढ झालेली दिसून आली. उदाहरणार्थ दिपक पडाखी हे इन्फोसिसच्या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचे एकूण वार्षिक वेतन 75 टक्क्यांनी वाढले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात त्यांचे वेतन 1.81 कोटी रुपये इतके होते. तेच 2018-19 मध्ये वाढून 3.16 कोटी रुपयांवर पोचले आहे. ग्लोबल इमिग्रेशन विभागाचे प्रमुख कौशिक आर एन यांच्या वार्षिक वेतनात 41 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. ग्लोबल टॅलेंट अॅंड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख बिनोद हम्पापूर यांचे वेतन 30 टक्क्यांनी वाढून 5.2 कोटी रुपयांवर पोचले आहे. या बहुतांश अधिकाऱ्यांच्या वेतनात घवघवीत वाढ होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण त्यांना विशेष भत्त्याअंतर्गत मिळालेले शेअर आहेत. या शेअरचे मूल्य वाढल्याचा लाभ या कर्मचाऱ्यांना झाला आहे. इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतनामध्ये निश्चित वेतन, परिवर्तनीय वेतन, निवृत्तीनंतरचे लाभ आणि विशेष भत्त्यांतर्गत मिळणारे शेअर यांचा समावेश असतो. 2018-19 या सरलेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांचा सरासरी वार्षिक वेतन 6.2 लाख रुपये इतके आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इन्फोसिसमध्ये गुणवत्ता आणि कामगिरीला मोठे महत्त्व दिले जाते. त्यामुळे अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ केली जाते. 

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 24.67 कोटी रुपयांचे वार्षिक वेतन दिले आहे. पारेख जानेवारी 2018 मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात सलील पारेख यांना 6.07 कोटी रुपयांचे निश्चित वेतन आणि 10.96 कोटी रुपये बोनस, भत्ते आणि इतर सुविधांच्या रुपात देण्यात आले होते. त्याचबरोबर 1,03,604 प्रतिबंधित शेअरसाठीही पारेख यांना 7.64 कोटी रुपये कंपनीकडून देण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 60 senior executives at Infosys earned more than Rs 1 crore in FY19