एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असणं धोक्याचं; अशी घ्या खबरदारी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 30 October 2020

अनेकदा आपण एकापेक्षा अधिक बँकांमध्ये अकाऊंट काढतो, पण अनेक बँकामध्ये अकाऊंट असणे नुकसाणीचे ठरु शकते.

नवी दिल्ली- अनेकदा आपण एकापेक्षा अधिक बँकांमध्ये अकाऊंट काढतो, पण अनेक बँकामध्ये अकाऊंट असणे नुकसाणीचे ठरु शकते. व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्यांना याकडे लक्ष द्यायला हवे. नोकरी करणारे लोक सतत आपली कंपनी बदलत असतात. अशावेळी त्यांना कंपनीकडून नवीन बँक अकाऊंट काढण्यास सांगितले जाते. नवीन अकाऊंट उघडले जाते, पण जूने अकाऊंट बंद होत नाही. एक दिवस कोणत्यातरी एका बँक अकाऊंटमध्ये घोटाळा झाल्याचे समोर येते. अशा परिस्थितीत जर तुमचेही एकापेक्षा अधिक बँकेमध्ये अकाऊंट असतील तर पुढील खबरदारी नक्की घ्या..

क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधी माहिती

जेव्हा अकाऊंट बंद कराल, त्याचवेळी संबंधित क्रेडिट-डेबिट कार्ड बंद करा.

बिनकामाच्या अकाऊंटला बंद करा

जर तुम्ही एखादे बँक खाते खूप काळापासून वापरत नसाल तर त्याला बंद करु टाका. अकाऊंटची मिनिमम बॅलेंसची मर्यादा खूप वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक अकाऊंटमध्ये मोठी रक्कम ठेवावी लागते. त्यामुळे जितके कमी अकाऊंट असतील तितके चांगले ठरेल.
 

लोन घेताना बंद बँक खात्याचीही माहिती द्यावी लागेल

जर तुम्ही होम लोन घेत आहात अशावेळी तुम्ही वापरत नसलेल्या बँक अकाऊंटची तुम्हाला माहिती द्यावी लागते. जर तुमच्या या अकाऊंटमध्ये बॅलेंस मेनटेन करण्यात आले नसेल, तर त्याचा परिणाम तुम्ही घेणाऱ्या लोनच्या मानकांवर पडू शकतो. 

कसं बंद करणार अनावश्यक बँक अकाऊंट

बँक अकाऊंट बंद करण्यासाठी तुम्हाला अकाऊंट क्लोजरचा फॉर्म आणि डी-लिंकिंग फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला बँक अकाऊंट बंद करण्याचे कारण सांगावे लागेल आणि दुसऱ्या अकाऊंटची माहिती द्यावी लागेल जेथे तुम्हाला बंद होणाऱ्या अकाऊंममधील पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. तुमच्या जवळ चेक बुक, डेबिट कार्ड असल्यास ते जमा करावे लागतील.

अकाऊंट बंद करण्यासाठीचे चार्ज

एका वर्षाच्या आत अकाऊंट बंद करत असल्यास तुम्हाला त्यासाठी चार्ज भरावा लागेल. सर्वसाधारणपणे एका वर्षानंतर अकाऊंट बद करत असल्यास बँक काहीही चार्ज लावणार नाही पण, बँकेनुसार हे बदलू शकते.

किती पैसे मिळणार रोख

जर तुमच्या खात्यात 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम असेल, तरी तुम्हाला रोख 20 हजार रुपयेच मिळतील. यावरील रक्कम तुम्ही सुचवलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येईल. 

बँक अकाऊंट बंद केल्यानंतर अकाऊंट क्लोजिंगचा उल्लेख असलेले स्टेटमेंट तुमच्यासोबत ठेवा, याची गरज तुम्हाला भविष्यात पडू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than one bank account cen be risky take fews precautions