जागतिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी टॉप 10 मध्ये 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या  क्रमांकावर आहेत. तर, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे प्रथम क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे 54 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. विशेष म्हणजे टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातून एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्ती 9 अब्ज डॉलर म्हणजेच 20 टक्क्यांनी वधारली  आहे 

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल 7 लाख 74 हजार 870.23 कोटी आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या बाजारभांडवलाने 8 लाख कोटींचा टप्पा पार केला होता. कंपनीत मुकेश यांचा 52 टक्क्यांचा हिस्सा आहे. महत्वाचे म्हणजे, 7 वर्षांपूर्वी अंबानी बंधू अनिल आणि मुकेश यांच्यात व्यवसाय आणि संपत्तीची विभागणी झाल्यानंतर मुकेश यांची संपत्ती तब्बल 30 अब्ज डॉलरने वाढली आहे. तर, अनिल यांची संपत्ती 65 टक्क्यांनी म्हणजेच 5 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. ती 7 अब्ज डॉलरवरून 2 अब्ज डॉलरवर येऊन पोचली आहे. 

देशांतर्गत श्रीमंत व्यक्तींचा विचार करता, हिंदुजा ग्रुपचे एस पी हिंदुजा ( 21 अब्ज डॉलर), विप्रोचे अझीम प्रेमजी (17 अब्ज डॉलर), सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला ( 13 अब्ज डॉलर) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Ranked Among Top 10 In Global Rich List By China's Hurun