केवळ 39 रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकने 7 वर्षात 1 लाखाचे केले 67 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stocks to Buy

केवळ 39 रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकने 7 वर्षात 1 लाखाचे केले 67 लाख

स्टॉक्समध्ये (Nazarstocks) गुंतवणूक करणे हे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखे आहे. गुंतवणुकदाराने कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर आणि तिच्या नफ्यावर विश्वास आहे तोपर्यंत त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संयम हा सर्वात मोठा गुण आहे. कारण शॉर्ट टर्मपेक्षा लाँग टर्ममध्ये शेअर बाजारात फायदा होतो हे इतिहास सांगतो.

याचे बेस्ट उदाहरण म्हणजे राजरतन ग्लोबलचे (Rajratan Global) शेअर्स. बीएसईवरील (BSE) राजरतन ग्लोबलचा स्टॉक 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक आहे. राजरतन ग्लोबल 30 जानेवारी 2015 ला बीएसईवर केवळ 39.11 रुपयांवर होता. हाच शेअर 28 जानेवारी 2022 ला म्हणजे 7 वर्षांनी 2620.45 रुपयांपर्यंत वाढला. याचा अर्थ या शेअरने त्याच्या गुंतवणुकदारांना न भुतो न भविष्यती असा सुमारे 6600 टक्के परतावा दिला आहे.

हेही वाचा: Multibagger Stock | 2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स ठरु शकतात मल्टीबॅगर

गेल्या 1 महिन्यात राजरतन ग्लोबलचा शेअर 2027 रुपयांवरून 2620.45 रुपयांपर्यंत वाढला आहे. या काळात त्याने सुमारे 30 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 वर्षात, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 375 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर शेअर 263.79 रुपयांवरून 2620.45 रुपयांपर्यंत वाढला आहे. या 5 वर्षात 900% परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने राजरतन ग्लोबलमध्ये 1 महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या 1 लाखाचे 1.30 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्याने वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज 4.75 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज 67 लाख रुपये मिळाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Multibagger Stocks Of Just Rs 39 Made Rs 1 Lakh In 7 Years 67 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top