म्युच्युअल फंडांकडे  पैशाचा प्रचंड ओघ 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई : म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे. म्युच्युअल फंडात छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना भौतिक मालमत्तांकडून आर्थिक मालमत्तांकडे वळण्यास मदत होऊ लागली आहे. 

"ऍम्फी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी एनएस व्यंकटेश म्हणाले, की गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असूनदेखील छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात चांगली गुंतवणूक केली आहे, तसेच गेल्या महिन्यात 1.5 लाख नवीन गुंतवणूकदार जोडले गेले आहेत. 

"ऍम्फी'च्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये 1 लाख 42 हजार 359 कोटी रुपयांची भर घातली आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे ऑक्‍टोबरमध्ये 35 हजार 529 कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली होती. 
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या या वाढत्या ओघामुळे म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रातील 42 कंपन्यांची नोव्हेंबर 2018 अखेरची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 24.03 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोचली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual funds log Rs 1.4 lakh cr inflows in November