रघुराम राजन म्हणतात... तर माझी बायको मला सोडून जाईन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

मी राजकारणी नाही तर शैक्षणिक क्षेत्रात आवड असणारा व्यक्ती आहे. ज्या क्षणी मी राजकारणात पाऊल टाकेल त्या क्षणी मी तुला सोडून जाईल अशी धमकी मला माझ्या बायकोने दिली आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली.

मी राजकारणी नाही तर शैक्षणिक क्षेत्रात आवड असणारा व्यक्ती आहे. ज्या क्षणी मी राजकारणात पाऊल टाकेल त्या क्षणी मी तुला सोडून जाईल अशी धमकी मला माझ्या बायकोने दिली आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष, तृणमूल कांग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि तेलगू देसम पक्ष प्रणित महाआघाडी सत्तेत आली तर रघुराम राजन यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना संभाव्य राजकारणाच्या प्रवेशाबद्दल विचारण्यात आले होते. 

रघुराम राजन हे 'लिबरल आर्ट्स युनिव्हर्सिटी'च्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी चेन्नई येथे गेले होते. त्यावेळी ही मुलाखत घेण्यात आली. लिबरल आर्ट्स युनिव्हर्सिटीच्या निधी उभारण्यात रघुराम राजन यांचा मोठा सहभाग आहे. 

रघुराम राजन यांनी लिहिलेल्या 'द थर्ड पिलर' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी बोलत असताना त्यांनी योग्य संधी मिळाल्यास मी ती स्वीकारेन असे  म्हटले होते. त्यामुळे योग्य संधी म्हणजे अर्थमंत्री पद आहे काय यावर चर्चा सुरु झाली होती. रघुराम राजन यांचे मोदी सरकारबरोबर आर्थिक मुद्द्यांवर मतभेद होते. त्यामुळे त्यांना गव्हर्नर पदाची दुसरी टर्म मिळाली नव्हती. तर, दुसरीकडे कांग्रेसच्या जाहीरनाम्यातील 'न्याय'योजनेला त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशासंबंधी बोलले जात आहे. 
 

Web Title: 'My wife has said she will not stay with me if I join politics: says Raghuram Rajan