मोदी सरकारची घोषणा; कोट्यवधी लोकांना मिळणार फायदा 

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये ज्या महिलांनी खाते उघडले आहे त्यांना ओव्हर ड्राफ्टची सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये आतापर्यंत 35.99 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्यातील 29.54 कोटी खाती मात्र अकार्यान्वित आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एका प्रश्नाला राज्यसभेत लिखित उत्तर देताना दिली. 

सीतारामण यांनी अर्थसंकल्पात जनधन खाते असणाऱ्या महिलांना ओव्हर ड्राफ्टची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र महिला सेल्प हेल्प ग्रुपच्या सदस्य असणे आवश्यक आहे. अशा महिलांनाच या ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ओव्हर ड्राफ्ट सुविधेमुळे महिलांना लहान व्यवसाय करण्यासाठी मदत मिळणार आहे. या योजनेंतर्गत खातेधारकांना  ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार असून मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे कर्ज देखील मिळणार आहे. 'नारी तू नारायणी' असे म्हणत सीतारामन यांनी या योजनेची माहिती दिली. 

जनधन योजनेंतर्गत खासगी बँकांमध्ये खाती उघडण्याचीही सरकारने  परवानगी याआधीच दिली आहे. सरकारी आकड्यांनुसार जनधन खात्यात एकूण जमा असलेल्या रकमेत वारंवार वाढ होत आहे. ही रक्कम 3 एप्रिलपर्यंत 97,665.66 कोटी रुपयांवर पोचली आहे. एकूण खात्यांपैकी 50 टक्के खाती ही महिलांच्या नावे आहेत.

केंद्र सरकार महिलांसाठी 'नारी तू नारायणी' या मोहिमेखाली महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना देखील आणणार आहे. शिवाय  देशाचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nari tu Narayani Budget 2019 to allow women entrepreneurs avail loan up to Rs 1 lakh under Mudra scheme