नवरात्रीचे ‘अर्थ’पूर्ण नऊ रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

नवरात्रीचे ‘अर्थ’पूर्ण नऊ रंग

१) पहिला दिवस : पांढरा रंग

नवरात्रीतील पहिल्या दिवसाचा रंग पांढरा मानला जातो. हा रंग शांततेचे प्रतीक आहे. तसेच पांढऱ्या रंगामुळे आत्मविश्वासही वाढतो. आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल, तर आपण आपल्या पैशांचे योग्य नियोजन करायला हवे. असे केल्याने आपला आत्मविश्वास नक्की वाढेल. असे हा रंग आपल्याला सुचवतो.

२ ) दुसरा दिवस : लाल रंग

नवरात्रीचा दुसरा दिवस हा लाल रंगाचा मानला जातो. लाल रंग हा उत्साहाचे प्रतीक आहे. हा रंग शक्ती आणि चैतन्य देतो. पैशाचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक केल्यास आपल्याला ‘आर्थिक’ शक्ती आणि चैतन्य मिळू शकते. हे या रंगाकडून आपण शिकू शकतो.

४) चौथा दिवस - पिवळा रंग

पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन आशावादी आणि आनंदी राहते. हा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपले मन आशावादी आणि आनंदी असणे आवश्यक असते, तरच आपण कायम प्रसन्न राहू शकतो,असे पिवळा रंग आपल्याला सुचवतो.

५) पाचवा दिवस -हिरवा रंग

हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे. हा रंग वाढ आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो तसेच जीवनातील नवीन सुरवातदेखील दर्शवतो. आयुष्यात अनेक चढउतार येत असतात अशावेळी आपली आर्थिक बाजू भक्कम असेल तर कोणत्याही संकटातून बाहेर पडून आपण नव्याने सुरवात करू शकतो. हे आपल्याला हिरव्या रंगाकडून शिकता येते.

६) सहावा दिवस - राखाडी रंग

हा रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी साधकबाधक विचार करून निर्णय घेण्याचा सल्लाच जणू हा रंग देत असतो. अगदी त्याच्याप्रकारे संतुलित विचार करणे आणि कोणत्याही परिस्थितीत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय न घेणे हा गुंतवणुकीचा पाया मानला जातो.

७) सातवा दिवस - केशरी रंग

केशरी रंग हा ऊर्जेचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग मनाला उत्साही ठेवतो. आपले उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन करणारी व्यक्तीदेखील केशरी रंगाप्रमाणे कायम आनंदी आणि उत्साही राहते.

८) आठवा दिवस- मोरपंखी रंग

निळ्या आणि हिरव्या रंगाचे विशेष मिश्रण असलेल्या या रंगात समृद्धी आणि नवीनता हे दोन्ही गुण असतात. गुंतवणुकीत सातत्याने येणारे नवीन पर्याय नीट हाताळले तर त्यातून समृद्धीचा मार्ग खुला होतो. हे या रंगातून आपल्याला शिकायला मिळते.

९) नववा दिवस - गुलाबी रंग

गुलाबी रंग हा आपुलकीचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या व्यक्तिमत्वात आकर्षकता निर्माण करतो. योग्य वयात आर्थिक नियोजन करून आपण आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो, की आपले व्यक्तिमत्व आकर्षक होण्यास मदत होते.या नवरंगांचे आणि त्यांच्या गुणांचे योग्य मिश्रण केल्यास आपले आयुष्य नक्कीच रंगीबेरंगी होऊन जाईल.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग सांगितला आहे. या नऊ दिवसात त्या विशिष्ट रंगाचा आपल्या जीवनात समावेश करणे खूप शुभ मानले जाते. थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या रंगांचा विचार केल्यास त्यातून आपल्याला बचतीचे आणि गुंतवणुकीचे कानमंत्रदेखील मिळतात. चला तर मग, पाहूयात हे नऊ रंग आपल्याला कोणता ‘अर्थ’ सांगतात.

(लेखक गुंतवणूक विषयाचे अभ्यासक आहेत.)