निर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या वर्षांत झाली 'इतकी' विक्री... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maggie.

नेस्ले कंपनीची मॅगी सर्वांचीच लोकप्रिय आहे. त्यातच आता नेस्लेनं 2019 मॅगीची केलेल्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. 2014 साली नेस्लेच्या  2,54,000 मेट्रिक टन मॅगीची विक्री झाली. तर त्याच्या तुलनेत 2019 साली नेस्लेनं जास्त प्रमाणात मॅगीची विक्री केली.

निर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या वर्षांत झाली 'इतकी' विक्री...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : नेस्ले कंपनीची मॅगी सर्वांचीच लोकप्रिय आहे. त्यातच आता नेस्लेनं 2019 मॅगीची केलेल्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. 2014 साली नेस्लेच्या  2,54,000 मेट्रिक टन मॅगीची विक्री झाली. तर त्याच्या तुलनेत 2019 साली नेस्लेनं जास्त प्रमाणात मॅगीची विक्री केली.  गेल्या वर्षी कंपनीनं 2,64,000 मेट्रिक टन मॅगी विक्री केली. 

वाचा ः नौदलातही पर्यावरण रक्षणाचे उपाय; नवनवीन साधनांचा करणार वापर

देशातील सर्वात मोठी खाद्य कंपनी नेस्लेनं अखेर चार वर्षांपूर्वी मॅगीच्या निर्बंधामुळे उद्भवलेला फटका भरून काढण्यात यश मिळवलं आहे. 2019 मध्ये मॅगी ब्रँडच्या उत्पादनाच्या विक्रीतील वाढीनं दर्जा आणि मूल्य या दोन्ही दृष्टीकोनातून 2014 साली झालेल्या पूर्व बंदीला मागं टाकलं आहे. वार्षिक अहवालात मिळालेल्या आकडेवारीनुसार 2014 साली 254,000 च्या तुलनेत 2019 च्या वर्षभरात सुमारे 264,000 टन मॅगी उत्पादनांची विक्री झाली. मूल्यांच्या दृष्टीनं, 2014 साली 2,961 कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीनं 2018 ला सालीचं प्री बॅन पातळी दरम्यान 3,105 कोटी रुपयांचं नुकसान भरुन काढलं. 2019 मध्ये त्याने 3,500 कोटी रुपयांची मॅगी उत्पादने विकली. कंपनी आर्थिक अहवालासाठी कॅलेंडर वर्षाचे स्वरुप फॉलो करते. 

वाचा ः कोरोना आणि विविध रक्तगट, कुणाला आहे सर्वाधिक धोका? नवीन संशोधन म्हणतंय...

नेस्ले कंपनी मात्र आपल्या सर्व श्रेणी वाढविण्यात अपयशी ठरली. कंपनीनं नेसकॅफे आणि नेस्टटी यासारख्या पेये ब्रँडचं दर्जा आणि मुल्यानुसार अनुक्रमे 2.3  टक्के आणि 1.4 टक्क्यांनी प्रतिनिधित्व केले. 2019 ला नेस्लेच्या किटकॅट, मॅगी, एव्हरी डे, सेरेलॅक या ब्रँड अंतर्गत सुरू केलेल्या 71 नवीन उत्पादनांच्या विक्रीत 4.4 टक्के वाटा होता, असं नमूद करण्यात आलं आहे. नेस्ले सध्या अस्तित्त्वात असलेल्या आठ बाजार श्रेणींमध्ये अग्रगण्य आहे. सेरेलॅक (अर्भक तृणधान्ये), नॅन आणि लॅक्टोजेन (अर्भक फॉर्म्युला), एव्हरी डे (चहाची क्रीम), मॅगी नूडल्स (इन्स्टंट नूडल्स), मॅगी पास्ता (इन्स्टंट पास्ता), किटकॅट, मिल्कीबार आणि मंन्च (चॉकलेट) आणि नेसकॅफे (इन्स्टंट कॉफी) - या संबंधित श्रेणीत नेस्ले कंपनी अव्वल आहे. स्थानिक बाजारात मॅगी केचअप हिंदुस्तान युनिलिव्हरच्या किसान केचअप नंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

वाचा ः मुंबईत मे महिन्यात केल्या गेलेल्या टेस्टिंग्सवर प्रश्नचिन्ह, एकीकडे वाढणारी रुग्णसंख्या तर दुरीकडे कमी टेस्टिंग्स?

एडलवेस सिक्युरिटीजच्या विश्लेषणानुसार, 2019 मध्ये नेस्ले कंपनीनं स्थिर पोषण, आरोग्य आणि निरोगीपणा कायम ठेवला. अत्याधुनिक विज्ञान आणि नावीन्यपूर्ण गुंतवणूक करून नूतनीकरणाच्या दिशेनं निर्णायक पाऊलं उचलून या कंपनीनं आपल्या विकासाच्या मार्गावर वाटचाल केली. गेल्या दोन वर्षात अंमलात आणलेल्या अनेक उपाययोजनांचा मोबदला कंपनीला मिळाला असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. सर्व ब्रँडसाठी शहरी वितरण आणि सेवा मजबूत करण्याव्यतिरिक्त, कंपनीनं ग्रामीण बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले. नवीन ग्राहक जोडण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी सुधारण्यासाठी - नव्या आउटलेट्शी जोडणं आणि प्रोडक्ट छोट्या पॅकच्या आकारात बनवून त्या नमुन्यांचं वाटप करणे. तसंच  विशिष्ट जाहिरात योजनांच्या माध्यमातून कंपनीचं उत्पादन पुढे आणण्यावर लक्ष केंद्रित केलं. या गोष्टींमुळेच कंपनीला फायदा झाला असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

loading image
go to top