केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारने दिली नवीन वर्षाची भेट! 

टीम ई-सकाळ
Tuesday, 5 January 2021

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेन्शनचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेन्शनचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकारने नवीन वर्षी केंद्रीय कर्मचार्‍यांना अपंगत्व भरपाई सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा सर्व विद्यमान कर्मचाऱ्यांना होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

सरकारने पेन्शनचे नियम बदलून आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी अपंगत्व भरपाई सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर, कर्तव्यावर असताना कोणताही कर्मचारी अपंगत्वाचा बळी ठरला तर त्याला सरकारकडून अपंगत्व भरपाई मिळत राहणार आहे. सरकारने केलेल्या या बदलाचा फायदा सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ जवानांसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंह यांनी सांगितले. 

2020 मध्ये स्टार्टअप्सची संख्या घटली; 75 टक्क्यांहून अधिक पडणार बंद?

सशस्त्र दलातील सैनिकांना कठीण परिस्थितीत काम करावे लागते. त्याच वेळी, त्यांच्या कामात जोखीम देखील जास्त आहे. याशिवाय त्यांच्या कामाचे स्वरूपही तणावपूर्ण आहे. अशा परिस्थितीत त्यांना अपंगत्वाचा सामना करावा लागला तर यापुढे सरकारकडून अपंगत्व भरपाई दिली जाणार आहे. व त्यांना याचा लाभ सेवानिवृत्तीनंतरही मिळणार आहे.

सरकारने केलेल्या या बदलाच्या माध्यमातून सेवा नियमातील अनियमितता दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1 जानेवारी 2004 नंतर राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत (एनपीएस) नोकरीत भरती झालेल्या कर्मचार्‍यांना अपंगत्व भरपाई दिली जात नव्हती. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून, यापुढे सर्वांसाठी अपंगत्व भरपाई दिली जाणार आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Year gift given by the government to the central employees