शेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16  अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 65 अंशांनी वधारून 10 हजार 682.20 अंशांवर बंद झाला.

शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये आज दबाव दिसून आला. दोन्ही निर्देशांकात अर्ध्या टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली. क्षेत्रीय पातळीवर पीएसयू बँक, फार्मा, आयटी आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर आज सर्वाधिक वधारले होते. तर मेटल आणि ऑइल अँड गॅस कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

आज मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेल, एचसीएल टेक, आयशर मोटर्स, ग्रासिम, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिरो मोटो, एसबीआय आणि एचडीएफसी यांचे शेअर प्रत्येकी 9.8 ते 1.7 टक्क्यांनी वधारून बंद झाले. तर येस बँक, इंडियाबुल्स हाउसिंग, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, आयओसी, मारुती सुझुकी, ओएनजीसी आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअरमध्ये प्रत्येकी 7.2 ते 1.4 घसरण नोंदवण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nifty ends above 10,650, Sensex up 197 pts