शेअर बाजार स्थिर 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

सेन्सेक्‍स आणि निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे 3 आणि 10 अंशांची किरकोळ वाढ झाली. 
तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजार सुरू झाला. या वाहन उत्पादक कंपन्यांचे शेअर आघाडीवर होते. एप्रिलमध्ये वाहन विक्रीत उच्चांक गाठणाऱ्या मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज आणि हिरोमोटो कॉर्प आदी शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचबरोबर गृह निर्माण क्षेत्रातील शेअर्सलाही मागणी होती.

मुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीकडे लक्ष लागलेल्या गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी (ता.2) शेअर व्यवहार स्थिर होते.

सेन्सेक्‍स आणि निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे 3 आणि 10 अंशांची किरकोळ वाढ झाली. 
तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजार सुरू झाला. या वाहन उत्पादक कंपन्यांचे शेअर आघाडीवर होते. एप्रिलमध्ये वाहन विक्रीत उच्चांक गाठणाऱ्या मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज आणि हिरोमोटो कॉर्प आदी शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचबरोबर गृह निर्माण क्षेत्रातील शेअर्सलाही मागणी होती. याशिवाय ओएनजीसी, एचडीएफसी, गेल, अदानी पोर्ट या शेअर्समध्ये वाढ झाली. तर लुपिन, भारती एअरटेल, रिलायन्स, सन फार्मा आदी शेअर्स घसरले. देशातील 13 राज्यांमध्ये रियल इस्टेट नियंत्रक नियमावली लागू झाली आहे.

यामुळे विकसकांच्या मनमानीला चाप बसणार असून, बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता येईल, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात येत आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी (ता.28) परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1 हजार 150 कोटींच्या शेअर्सची विक्री केली. बांधकाम क्षेत्रातील शेअर्स आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सनी सकाळच्या सत्रात निर्देशांकात वाढ केली. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. दिवसअखेर सेन्सेक्‍स 3 अंशांच्या वाढीसह 29 हजार 921 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 9.75 अंशांची वाढ झाली आणि तो 9 हजार 313 अंशांवर बंद झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nifty trades above 9310; Housing Finance stocks soars high