व्हिडिओकॉनचे सहा हजार कर्मचारी 10 महिन्यांपासून वेतनाशिवाय

 व्हिडिओकॉनचे सहा हजार कर्मचारी 10 महिन्यांपासून वेतनाशिवाय

औरंगाबाद: व्हिडिओकॉन समूहाचा औरंगाबाद येथे सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प आहे. मात्र सध्या या प्रकल्पात कर्मचाऱ्यांचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती आहे. मागील तब्बल 10 महिन्यांपासून व्हिडिओकॉनच्या कर्मचाऱ्यांचे त्यांचे वेतन मिळालेले नाही. या कारखान्यातील कामकाज जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे. जे काही उत्पादन होत आहे ते कंत्राटदारांकडून करून घेतले जात आहे. व्हिडिओकॉन कंपनी सध्या दिवाळखोर अवस्थेला पोचली आहे. त्यामुळे जवळपास 6,000 कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचबरोबर आपल्या भवितव्याच्यासंदर्भातसुद्धा हे कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत. एका इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

व्हिडिओकॉन सुमहाच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या गजानन बंडू खंदारे यांनी यासंदर्भातील माहिती देताना सांगितले आहे की कर्मचाऱ्यांना मागील 10 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. हा कारखाना आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. जेव्हा थर्ड पार्टी ऑर्डर येते तेव्हाच कारखान्यात काम केले जाते. कंपनीच्या संचालक मंडळातील अतिशय महत्त्वाचे संचालक यांना यासंदर्भातील पूर्ण कल्पना आहे. ते नियमितपणे कारखान्याला भेट देत असल्याचेही समोर आले आहे. 

राजकुमार धूत आणि प्रदीप धूत यांनी एक आठवड्याअगोदरच आपल्या खासगी सुरक्षारक्षांसहित कारखान्याला भेट दिल्याची माहिती खंदारे यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी वेतन न मिळाल्याच्या निषेदार्थ आंदोलन केल्यावर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हे नोंदवल्याचे तसेच स्वत: आपल्यालाही तीन वेळा जेलमध्ये पाठवल्याचे खंदारे यांनी म्हटले आहे. व्हिडिओकॉन समूहाच्या औंरगाबादमधील कारखान्यात तीन मोठ्या कामगार संघटना आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची यासंदर्भात अशीही तक्रार आहे की काही कामगार नेते हे वेतन मिळत नसतानाही कंपनीच्या व्यवस्थापनाशी तडजोडी करत आहेत. आम्हाला आमच्या मुलांची शाळेची फी आणि वैद्यकीय खर्चही भागवणे अवघड झाले आहे. 

आर्थिक संकटामुळे आमच्या मुलींचे विवाहदेखील करणे अशक्य झाल्याचे एका ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. व्हिडिओकॉनच्या अनेक उच्चपदस्थ अधिकारी कंपनी कर्जाच्या विळख्यात अडकायला लागल्यानंतरच नोकरी सोडून गेले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आपल्या वेतना आणि थकबाकीसंदर्भात कंपनीकडे मागणी केली त्यांना कोर्ट केसेसना सामोरे जावे लागत असल्याचेही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कारखान्यात सध्या मोठ्या ब्रॅंडसाठी (एलजी, फिलिप्स, ह्युंदाई) कंत्राटी पद्धतीने फ्रिज, वॉशिंग मशिन आणि इतर इलेक्ट्रीक उपकरणांचे उत्पादन केले जाते. 

कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनाच्या थकबाकीच्या एकूण 103.5 कोटी रुपयांची मागली मे महिन्यातच केली आहे. त्याबरोबरच व्हिडिओकॉनवर वित्तसंस्थाची 59,452 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याशिवाय व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्स या आणखी एका कंपनीवर वित्तसंस्थांचे 26,673 कोटी रुपयांचे कर्ज आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सर्वाधिक 15,780 कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन समूहाने थकवलेले आहे. डिसेंबर 2018 अखेर व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने एकूण 5,122 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. 2017-18 या आर्थिक वर्षात कंपनीला 5,264 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

भरभराटीच्या कार्यकाळात कंपनीचा महसूल 10,000 कोटी रुपयांवर तर नफा 800 कोटी रुपयांवर होता. जानेवारी 2008 मध्ये 755 रुपये प्रति शेअरवर असलेला कंपनीचा शेअर सध्या 2 रुपयांवर आला आहे. व्हिडिओकॉनचे सध्याचे बाजारमूल्य फक्त 54 कोटी रुपये आहे इतके आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com