तुमचा आवडता फोन लवकरच लाँच होतोय…

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात आहे. नोकिया फोन्सचे मार्केटिंग अधिकार असणाऱ्या एचएमडी ग्लोबलने हा इव्हेंट आयोजित केला आहे.

नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात आहे. नोकिया फोन्सचे मार्केटिंग अधिकार असणाऱ्या एचएमडी ग्लोबलने हा इव्हेंट आयोजित केला आहे.

नोकियाने काही महिन्यांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया 3, 5 आणि 6 सादर केले होते. याचवेळी नोकिया 3310 नव्या रुपात सादर करण्याची घोषणा झाली होती. हे सर्व फोन जून महिन्यात सादर होतील अशी चर्चा सुरु झाली होती. भारतीय बाजारपेठेत हा फोन दुसऱ्या तिमाहीत सादर होईल असे बोलले जात होते. परंतु, एचएमडी यासाठी अधिकृत तारखा जाहीर केलेल्या नाहीत. पुढील आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माहिती-तंत्रज्ञान युगातील ‘स्मार्ट’ पिढीची गरज ओळखून मोबाईल कंपन्यांनी ‘स्मार्ट मोबाईल फोन’ची निर्मिती केली आणि अल्पावधीतच हा फोन अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला! ‘स्मार्ट फोन’च्या या जमान्यात आणि ‘आयफोन 7’ची चर्चा असताना कोणे एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ हा फोन आता नवीन रंगरूपात येऊ घातलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा तोच फोन आणण्याची गरजच काय, येथपासून या फोनचा ग्राहक कोण असेल, याच्या चर्चांना उधाण आले होते. दुसरीकडे, 50 ते 60 या वयोगटातील ग्राहक 17 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या पहिल्या-वहिल्या मोबाईलच्या आठवणी जागवत नव्या रूपातील फोनला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा मोबाईल कसा दिसेल, त्याचे डिझाईन पूर्वीप्रमाणेच असेल का, नवी फीचर्स काय असतील, असे असंख्य प्रश्न त्यांना पडले आहेत.

अनेकांना सेकंडरी फोन म्हणून फीचर फोनची आवश्‍यकता असते. ‘नोकिया 3310’ हा दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन असल्यामुळे ‘स्मार्ट फोन युजर्स’ या फोनला सेकंडरी फोन म्हणून स्वीकारतील, या मतावर कंपनी ठाम आहे.

फोनची वैशिष्ट्ये

 • वॉर्म रेड, यलो, डार्क ब्लू आणि ग्रे या रंगात उपलब्ध.
 • मोबाईलमधून बॅटरी वेगळी करता येणार.
 • 16 जीबी बिल्ट-इन मेमरी, तसेच मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येणार.
 • यूएसबी चार्जरची सोय. हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडिओ.
 • 2  मेगापिक्‍सेल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशची सुविधा.
 • 1200 एमएएच क्षमतेची बॅटरी असल्याने 22 तासांचा टॉकटाइम आणि महिनाभराचा स्टॅन्ड बाय टाइम.
 • ‘ब्ल्यू टूथ कनेक्‍टिव्हिटी’ आणि ‘एमपी थ्री प्लेअर’.
 • 2.4 इंच क्षमतेचा डिस्प्ले आणि 2 जी कनेक्‍टिव्हिटी.
 • जुन्या मोबाईलपेक्षा वजनाने हलका.
 • सर्वांच्या आवडत्या स्नेक गेमचा समावेश. मल्टिकलरमध्ये गेम उपलब्ध.
 • या फोनची किंमत अजून जाहीर केलेली नसली, तरी अंदाजे 3,500 ते 4,150 रुपये किंमत असण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nokia 3310 to launch in Indian market next quarter, price around Rs 3500