इन्फोसिसची धुरा देताना केली मोठी चूक; असं का म्हणाले नारायण मूर्ती? Infosys Founder Narayana Murthy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infosys founder narayana murthy

इन्फोसिसची धुरा देताना केली मोठी चूक; असं का म्हणाले नारायण मूर्ती?

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी म्हटले की, आयटी सेवा कंपनीचा कारभार नव्या पिढीकडे न सोपवणे ही त्यांची मोठी चूक होती. त्यांचा हा निर्णय चुकला आहे असे त्यांनी सांगितले आहे. कंपनीच्या संस्थापकाच्या पुढच्या पिढीला कंपनीत सहभागी करून घेऊ नये हे चुकीचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या पुढच्या पिढीला इन्फोसिसपासून दूर ठेवण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण मूर्ती यांचा असा विश्वास आहे की, इन्फोसिस ही व्यावसायिकांनी चालवलेली कंपनी आहे. आतापर्यंत मुलांना कंपनीतील व्यवस्थापनाच्या कोणत्याही भूमिकेपासून दूर ठेवले पाहिजे, असे मूर्ती यांचे मत होते.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी नुकतेच बेंगळुरू येथे इन्फोसिसला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. नारायण मूर्ती म्हणाले, मी आतापर्यंत इन्फोसिससारख्या माझ्या संस्थेला टॅलेंटपासून वंचित ठेवत होतो. मला वाटते की जर कोणी प्रतिभावान असेल तर त्याला समान संधी मिळायला हवी.

हेही वाचा: इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

नारायण मूर्ती म्हणाले, त्यावेळी मी हे मत व्यक्त केले होते. कारण मला भीती होती की, काही लोक अपात्र लोकांना आणतील आणि त्यांना उच्च व्यवस्थापन पदांवर बसवतील. कंपनीचे भविष्य भक्कम असावे अशी माझी इच्छा होती. नारायण मूर्ती म्हणाले, जेव्हा एखाद्याला नोकरीची ऑफर दिली जाते, तेव्हा प्रत्येक गोष्टीला त्याच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे.

टॅग्स :companyInfosys