नोटाबंदीनंतर काळे धन वाढले 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर काळ्या पैशाचा वापर वाढला आहे. नोटाबंदीनंतरच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर अधिक वाढला असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त ओ. पी. रावत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीला लक्ष्य केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी झालेल्या निवडणुकीत अधिक काळा पैसे जप्त करण्यात आला. 

रावत यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत नोटाबंदीनंतरच्या निवडणुकीत अधिक काळा पैसा जप्त करण्यात आला होता. नरेंद्र मोदी सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नोटाबंदीसारखे मोठे पाऊल उचलले होते. मात्र तरीही त्याचा काहीही फायदा झाल्या नसल्याचे रावत यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशाची वापराची आकडेवारी पाहता नोटाबंदीचा काहीही फायदा झालेला नाही. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Note ban had no impact, failed to keep check on black money