घर घेणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन' आणखी एका बँकेने घेतला ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

गृह कर्जासाठीचा नवीन व्याज दर 18 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आला आहे. गृह कर्जावरील व्याज दर हा  6.90 टक्के पासून पुढे आकरण्यात येणार असल्याचे बँकेने एका निवेदनातून स्पष्ट केले आहे. नवे व्याज दर हे कर्जाची रक्कम (Loan Amount) आणि अर्जदाराच्या कामाचा हुद्दा यावर अवलंबून असेल.  

कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँकेनं (UCO Bank) ग्राहकांना व्याज दरात (Interest Rate) मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय.  यूको बँकेने होम लोन (Home Loan) वर 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून गृह कर्जासाठीचा नवीन व्याज दर 18 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आला आहे. गृह कर्जावरील व्याज दर हा  6.90 टक्के पासून पुढे आकरण्यात येणार असल्याचे बँकेने एका निवेदनातून स्पष्ट केले आहे. नवे व्याज दर हे कर्जाची रक्कम (Loan Amount) आणि अर्जदाराच्या कामाचा हुद्दा यावर अवलंबून असेल.  

SBI नं ही केली व्याज दरात कपात 

कोरोनातून सावरत असताना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम वर्गातील उद्योग क्षेत्रात (MSMEs) 3,000 कोटी कर्ज पुरवठा होईल, असा विश्वास स्टेट बँक ऑफ इंडियाला आहे. यातील 1,900 कोटी रुपये  इतक्या रक्कम मंजूरही करण्यात आली आहे. यापूर्वी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने  होम लोन दरात 0.25 टक्के कपात केली होती. एवढेच नाही तर त्यांनी प्रोसेसिंग फी  (Home Loan Processing Fees) आकारणेही बंद केले आहे. बँकांच्या या निर्णयामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. सध्याच्या घडीला SBI होम लोन (SBI Home Loan)  6.90 टक्के इतक्या वार्षिक दराची ऑफर सुरु आहे. 30 लाख पर्यंतच्या लोनसाठी ही ऑफर मर्यादित आहे.  

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी लिमिटेडने देखील होम लोनवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मॉर्गेज लोन देणाऱ्या या बँकेनं  रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये कपात केली आहे. या दरात 0.10 टक्के कपातीचा निर्णय हा 10 नोव्हेंबर 2020 पासून लागू करण्यात आला आहे. व्याज दर कपातीचा फायदा सर्व ग्राहकांना मिळणार आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो रेट  0.15 टक्के इतक्या दरांनी कमी केला आहे. त्यामुळे होम लोनवरील व्याज दर  6.90 टक्के इतके आहेत. 7 नोव्हेंबरपासून हे दर लागू करण्यात आले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now loan from uco bank is cheaper this government bank cut interest rate home loan