अनिवासी भारतीयांचा चलन स्थिरतेत खारीचा वाटा

कैलास रेडीज
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मुंबई - उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) मातृभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमातून योगदान वाढवले आहे. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनआरआय’कडून भारतात हस्तांतर होणाऱ्या निधीत व खासगी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे डॉलरसमोर होरपळणाऱ्या रुपयाला सावरण्यास एनआरआयनी खारीचा वाटा उचलला. 
‘एनआरआय’ दर वर्षी कोट्यवधी रुपये भारतातील नातेवाइकांना पाठवतात.

त्यांच्याकडून परकी निधी स्वीकारणाऱ्या (रेमिटन्स) देशांमध्ये भारत सर्वांत अव्वल आहे. भारतात अनिवासी भारतीयांकडून दर वर्षी सरासरी ६९ अब्ज डॉलर निधी पाठवला जातो. रेमिटन्स व्यतिरिक्‍त थेट परकी गुंतवणुकीच्या माध्यमातून (एफडीआय) ‘एनआरआय’ उद्योजक मोठा हातभार लावणार आहेत. २०१६-१७ या वर्षात ९९२ कोटींची एफडीआय भारतात प्राप्त झाली. पर्यटन, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य सेवा आदी क्षेत्रांमध्ये ‘एनआरआय’कडील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. रिझर्व्ह बॅंकेने रुपयाला सावरण्यासाठी ‘एनआरआय’ बॉण्ड्‌सचा तीन वेळा वापर केला होता. 

‘एनआरआय’साठी बॅंकांच्या विशिष्ट ठेव योजना असून, ज्यात निधीचा ओघ वाढत आहे. याशिवाय भांडवली बाजारातील निधीचा ओघ वाढवण्यासाठी सरकारकडून नियमावली शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परदेशी रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना केंद्र सरकारकडून प्रवासी कौशल विकास योजनेंतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पुरवले जाते. काही वर्षांत भारताला कुशल मनुष्यबळाचे केंद्र बनवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अनिवासी भारतीय उद्योजकांच्या संघटनांना जोडण्याच्या अभियानातून चांगले परिणाम दिसून आले आहेत. 

अनिवासी भारतीय दिनाचे महत्त्व
अनिवासी भारतीयांना मातृभूमीच्या विकासाकरिता योगदान देण्यासाठी सरकारकडून साद घातली जाते. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले, तो नऊ जानेवारी हा दिवस ‘प्रवासी भारतीय दिन’ म्हणून ओळखला जातो. यंदा २१ ते २३ जानेवारीदरम्यान कुंभमेळ्यानिमित्त वाराणसी येथे १५ वा प्रवासी भारतीय दिन साजरा केला जाणार आहे.

अनिवासी भारतीयांचे योगदान
३ कोटी अनिवासी भारतीयांची संख्या
३.४ टक्के ‘जीडीपी’मध्ये योगदान
१००० कोटी दर वर्षी सरासरी गुंतवणूक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NRI Challan Investment