new rules from 1 october
new rules from 1 october

देशात 1 ऑक्टोबरपासून नवे नियम; बेकरी पदार्थ,वाहतूक नियम ते विमा पॉलिसीत होणार बदल

नवी दिल्ली: कोरोनाकाळात देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. याकाळात देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. देशाचा जीडीपी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत '-24' टक्क्यांपर्यंत उतरला आहे. अशातच सामान्य लोकांच्या खिशाला अजून झळ पोहचणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यापासून काही देशात काही नियम लागू होणार आहेत जे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम करतील. घरातील वापरायचा गॅसच्या किंमती, आरोग्य विमा, परदेशात पैसे पाठवण्यासाठी लागणारा टीसीएस यांच्या किंमती वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

मोहरीचं तेल मिसळण्यास बंदी
एफएसएसएआयने (FSSAI-Food Safety and Standards Authority of India) उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलाबाबत नवीन नियम जारी केले आहेत. FSSAI नव्या आदेशानुसार, इतर कोणत्याही खाद्यतेलाचे मोहरीच्या तेलात मिश्रण करण्यास बंदी असणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या मिसळण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात FSSAI की, भारतातील इतर कोणत्याही खाद्यतेलात मोहरीच्या तेलाच्या मिश्रणावर 1 ऑक्टोबर 2020 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या किंमतीत बदल होतील.

बेकरी खाद्यपदार्थांबाबत नवा नियम
खाण्यापिण्याचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने नवीन नियम (Sweet Outlets) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2020 पासून स्थानिक मिठाईच्या दुकानांदारांना बॉक्समध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईसाठी 'उत्पादनाची तारीख' आणितसंच पदार्थ कधीपर्यंत खाण्यायोग्य (Best Before Date) इत्यादी माहिती दाखवावी लागेल.

वाहतूक मंत्रालयाचा निर्णय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियमावलीतील  (Motor Vehicle Rules) काही दुरुस्त्या केल्याची माहिती दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून सरकारी वेब पोर्टलद्वारे नागरिकांना वाहन परवाना, नोंदणी कागदपत्रे, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट्स इत्यादी आवश्यक वाहनांसंबंधी कागदपत्रे मिळू शकतात. तसेच  इम्पाउंडिंग, एंडॉर्समेंट, वाहन परवान्यांचं  सस्पेंशन व रिवोकेशन, रजिस्ट्रेशन आणि ई-चलनचंही काम डिजीटल होणार आहे. 

विमा पॉलिसीमध्ये ग्राहककेंद्रीत बदल
विमा नियामक आयआरडीएआयच्या नियमांनुसार आरोग्य विमा पॉलिसीमध्येदेखील मोठे बदल होणार आहेत. सर्व विद्यमान आणि नवीन आरोग्य विमा पॉलिसी महागाईच्या दराने अधिक रोगांसाठी संरक्षण प्रदान करतील. आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहककेंद्रित बनवण्यासाठी हा बदल केला जात आहे. त्यात इतरही अनेक बदलांचा समावेश असणार आहे. 

Petrol Price Today - सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त; आजचे दर किती?
 
गॅस दर कमी होण्याची शक्यता
दर महिन्याच्या सुरुवातीला सरकारी कंपन्या एलपीजी आणि नैसर्गिक वायूच्या किंमती नवीन जाहीर करतात. मागील महिन्यात, सप्टेंबरमध्ये 14.2 किलो आणि 19 किलो गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले होते. आता ऑक्टोबरमध्ये एलपीजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

टीव्ही महागणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने ओपन सेल  (Open Cell) आयातीवरील असणारी 5 टक्के कस्टम ड्युटीची  (Custom Duty) सवलत ३० सप्टेंबरपासून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे टीव्हींच्या किंमती महागू शकतात. कलर टेलिव्हिजनसाठी ओपन सेल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ओपन सेलच्या आयातीवरील शुल्काचा भारतातील  टीव्हींच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com